आंबेडकरी चढवळ पुढे नेण्यात भिमगीतांचे मोठे योगदान असून भिमगीतातून मिळणा-या प्रेरणेतूनच उदयाचा समाज प्रबळ आणि सक्षम होणार असे वक्तव्य सामाजीक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी केले. संघर्ष युवा मंचच्या वतीने बाबूपेठ येथे जल्होश भिम गीतांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी बी.आर.एसपी. चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडेनगर सेवीका पुष्पा मूनअमोल गोवर्धनसतीश जामलेलता सहारे युवा समाजीक कार्यकर्ते सचिन किरमेसमाजीक कार्येकर्ते भास्कर कावळेआदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. सर्वप्रथम बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला किशोर जोरगेवार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रम स्थळी तथागत गौतम बुद्ध, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले कीशिकासंघटीत व्हा आणि संघर्ष करा असा नारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता.

चंद्रपूर: पटणा-पूर्णा (17609/17610) या एक्सप्रेसचा थांबा विख्यात समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याचा सुगंध जागतिक स्तरावर पोहचविणा-या आनंदवन स्थित वरोरा या शहरात मंजूर करण्यात यावा अशी मागणी वरोरावासीयांकडून सातत्याने केली जात होती. अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वरोरा वासीयांच्या या मागणीची पूर्तता करून त्यांच्या भावनांना न्याय दिला आहे. येत्या 4 फेब्रुवारी 2019 रोजी रात्राी 10.00 (22.00) वाजता वरोरा येथे ही एक्सप्रेस पहिल्यांदाच थांबणार असल्याने वरोरा वासियांमध्ये या एक्सप्रेसला घेवून जल्लोषाचे वातावरण आहे. सदर एक्सप्रेसचा थांबा देशाचे वैभव असलेल्या कुष्ठरोगी तसेच दिव्यांगांना समर्पित आनंदवन स्थित वरोरा या शहरात द्यावा यासाठी ना. अहीर यांनी विशेष भुमिका घेतल्याने केंद्रीय रेल्वे मंत्राी पियुष गोयल यांनी या भुमिकेचा आदर करीत वरोरा येथे या एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतांनाच त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिल्याने आता येत्या सोमवारी ही एक्सप्रेस वरोरा रेल्वे स्थानकावर थांबत आहे.

चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत आरोग्याच्या सोइ, सुविधा पोहचण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील प्रत्येक माणसाला आरोग्याच्या लाभ मिळण्यासाठी रोगनिदान शिबीर उत्तम माध्यम असल्याचे मत आमदार नानाजी शामकुळे यांनी व्यक्त केले. ते ओबीसी मोर्च्या प्रसिद्धी प्रमुख  संजय पटले यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ आयोजित रोगनिदान शिबीर कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. अंजलीताई घोटेकर, भाजप युवा नेता मोहन चौधरी, नगरसेवक अंकुश सावसाकडे, नगरसेविका वंदना जांभुळकर, चंद्रकलाताई सोयाम, शशी सिंग, चंदन पाल, रमाकांत यादव, अनुप यादव, मनोज जीवतोडे, गजानन राऊत, धम्मप्रकाश भम्मे, सचिन शामकुळे, आशिष ताजणे, सुभाष मलेकर, सूरज सोयाम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी रक्तगट तपासणी११७, मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी ४५, कान, नाक, घसा ४५ तपासणी येथील नागरिकांनी केली.

चंद्रपूर जिल्‍हयातील मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या आज झालेल्‍या बैठकीत घेण्‍यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य शासनाने हा निर्णय घेतला आहे. जुलै 2018 च्‍या नागपूर येथे झालेल्‍या पावसाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा व उत्‍तर महाराष्‍ट्राच्‍या विकासासाठी घोषीत करण्‍यात आलेल्‍या विशेष पॅकेजमध्‍ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधीची घोषणा केली होती.चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांच्‍या उपजिवीकेचे साधन प्रामुख्‍याने जंगल व शेतीवर आधारित आहे. सदर जिल्‍हयातील नागरिकांची कृषी शिक्षण घेण्‍याची मानसिकता असून सुध्‍दा सदर जिल्‍हा मागास असल्‍यामुळे या जिल्‍हयांमध्‍ये युवक व युवतींसाठी कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करणे गरजेचे आहे. ज्‍यामुळे आधुनिक कृषीतंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यासाठी ग्राम पातळीवर विस्‍तार कार्यकर्ते, ग्रामसेवक, कृषीमित्र व तज्ञ मार्गदर्शक निर्माण होवू शकतील. या क्षेत्राची ही विशिष्‍ट गरज लक्षात घेता डॉ. प्ंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव विद्यापीठामार्फत शासनाला सादर करण्‍यात आलेला आहे. या प्रस्‍तावाला आज मंत्रीमंडळाची मान्‍यता मिळाली आहे.मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्‍थापन झाल्‍यास जिल्‍हयातील युवक युवतींसाठी कृषी पदवीधर अभ्‍यासक्रमाची सुविधा निर्माण होणार असुन त्‍या माध्‍यमातुन बदलत्‍या हवामानानुसार कृषी व्‍यवसाय, शेतीपूरक व्‍यवसाय व शेती उद्योग ज्‍या मुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार या भागात होवू शकतो. तसेच शेतक-यांना आधुनिक पध्‍दतीने शेती कशी करावी यासंबंधीचे प्रशिक्षण व सल्‍ला देवून पिकांची उत्‍पादकता वाढून पर्यायाने त्‍यांचा आर्थिकस्‍तर उंचावेल. ही गरज लक्षात घेता हे महाविद्यालय स्‍थापन करण्‍याचा प्रस्‍ताव शासनाला सादर करण्‍यात आला आहे.

चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर मुन्नारगुडी ते भगत की कोठी, गांधीधाम-विशाखापट्टनम तसेच तिरूवेनपल्ली ते बिलासपूर या सुपरफास्ट रेल्वे गाडयांचा थांबा मंजूर झाला असून गांधीधाम-विशाखापट्टनम ट्रेन नं. 18502 ही गाडी सोमवारला रात्रौ 22.45 वा. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार असून तिरूनेलवेली-बिलासपूर ट्रेन नं. 22620 ही साप्ताहीक गाडी सोमवारी दुपारी 12.02 वाजता चंद्रपूर स्थानकावर पोहचेल तसेच बिलासपूर-तिरूनेलवेली टेªेन नं. 22619 मंगळवार दि. 05 फेब्रुवारी 2019 रोजी 17.52 ला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. याबरोबरच मुन्नारगुडी ते भगत की कोठी ट्रेन नं. 16864 ही गाडी मंगळवारला दुपारी 12.02 ला चंद्रपूर स्थानकावर पोहचेल. विशाखापट्टनम-गांधीधाम ट्रेन नं. 18501 ही गाडी शुक्रवारी सकाळी 8.40 ला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचेल तसेच भगत की कोठी  (जोधपूर) ते मुन्नारगुडी ट्रेन नं. 16863 ही गाडी शुक्रवारी सायं. 19.18 ला चंद्रपूर स्थानकावर पोहचेल.

 यादे राहुल चौधरी चषक यांच्या स्मृती प्रीत्यर्थ पठाणपुरा व्यायाम शाळा क्रीडा मंडळचंद्रपूर च्या वतीने जिल्हास्तरीय पुरुष व महीला कबड्डी सामन्याचे आयोजन पठाणपुरा व्यायाम शाळेच्या भव्य पटांगणावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा नेते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी सांगीतले कीजिवनात आज खेळाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. खेळाच्या माध्यमातुन अनेकांनी आपले व देशाचे नांव उंचावले आहे. खेळातुन युवक वर्गाने आपला विकास घडवावा. कारण जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळाडू वृत्ती हीच आवश्यक आहे. तसेच जिल्हयातील व विदर्भातील खेळाडुला कोणत्याही अडचण भासत असेल तर माझ्याशी व माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी ग्वाही देत खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

सतत दोन दिवस चंद्रपूरात झालेल्या अवकाळी  पावसामूळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकासान  झाले असून त्यांच्या संकट कोसळले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाने तात्काळ एकरी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी  सामाजीक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सतत होणा-या वातावरणातील बदलामूळे शेतक-यांना दरवर्षी संकटाला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या हंगामात भरभरुन पिक घेवून जुने कर्ज फेडण्याच्या आशेने पोशिंदा जोमाने शेतीच्या कामाला लागला. उधारवाडी करत  बि बियाने खेरेदी करुन त्याने शेती फुलवली. मात्र यंदाही नियतीने त्यांच्या स्वपनांवर पाणी फेरले आहे.

 मागील दोन दिवसांपासुन सोसाटयाच्या वा-यासह सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील अणेक घरांची पडझोड झाली आहे. आज शनिवारी  किशोर जोरगेवार यांनी काही प्रभागात पाहणी करुन नुकसाणग्रस्त कुटुबाला आर्थिक मदत केली असून  प्रशासनानेही   या भागांची पाहणी  करुन आर्थीक मदत जाहिर करावी अशी मागणी केली आहे. 

Page 2 of 7
  • 001
  • 002

फोटोगॅलरी

मुलाखत

आरजे शुभम बद्दल आणखी थोडं….

आज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……