चंद्रपूर जिल्‍हयातील वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानुर या तीन बॅरेज च्‍या स्‍थळी 7.50 मीटर पेक्षा जास्‍त खोलीवर कठीण भूस्‍तर उपलब्‍ध होत असल्‍यामुळे सर्वेक्षण, अन्‍वेषण, संकल्‍पन व सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल वॉप्‍कोस या संस्‍थेकडून करून घेण्‍यासाठी मान्‍यता देण्‍याचा ठराव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्‍या नियामक मंडळाच्‍या बैठकीत पारित करण्‍यात आला आहे. सदर तिन्‍ही बॅरेजेसच्‍या कामासाठी निधी उपलब्‍ध करण्‍याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या मागणीसाठी अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्‍लीत भेट घेतली व मागणीचे निवेदन सादर केले.

अविरत काम करुन शहरातील प्रत्येक घरात प्रकाश पोहचवीण्याचे काम करणा-या महावितरणच्या कामगारांसह अभियंत्यांवर आंदोलनाची वेळ ओढावणे हे दुर्दैव आहे. त्यांच्या मागण्या न्यायक असून त्या पुर्ण करण्यात याव्हा अशी मागणी चंद्रपूर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी पूकारलेल्या आंदोलनालाही जोरगेवार यांनी आपला पाठींबा दर्शवीला आहे. विविध मागण्यांसाठी महावितरण केंद्रात काम करणा-या कामगारांसह अभियंत्यांनी आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी आज सोमवारी 24 तासांचा संप पुकारला होता. यावेळी त्यांना मार्गदर्शन करतांना जोरगेवार बोलत होते.

आयटीसी अगरबत्‍ती प्रकल्‍प, महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळ आणि बांबु संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पोंभुर्णा येथे उभारण्‍यात येणारे अगरबत्‍ती युनिट या परिसरात रोजगार निर्मीतीचे प्रशस्‍त दालन ठरेल व त्‍या माध्‍यमातुन परिसराच्‍या विकासात भर घातली जाईल अशी अपेक्षा अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

बल्‍लारपूर विधानसभा मतदार संघ हा महाराष्‍ट्रातीलच नव्‍हे तर देशातील पहिला आरो युक्‍त मतदार संघ ठरेल यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. हा मतदार संघ शंभर टक्‍के एलपीजी गॅसयुक्‍त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धूरमुक्‍त गावांचे स्‍वप्‍न आपल्‍याला साकार करायचे आहे. या मतदार संघातील 125 गावांमध्‍ये आकर्षक असे प्रवासी निवारे बांधण्‍याचा संकल्‍प आपण केला असून पदमापूर आणि आगरझरी या गावांमध्‍ये पहिला प्रयोग आपण राबविला आहे. या मतदार संघातील सर्व अंगणवाडया आय.एस.ओ. मानांकित करून त्‍या माध्‍यमातुन 0 ते 6 वयोगटातील बालकांना योग्‍य शिक्षण व संस्‍कार देण्‍याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने आगरझरी येथे 10 लक्ष रू. निधी खर्चुन आमदार निधीतुन सामाजिक सभागृह बांधण्‍याची घोषणा त्‍यांनी यावेळी केली.

बफर झोन क्षेत्राच्‍या विकासासाठी आम्‍ही डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अमलात आणली. त्‍यामाध्‍यमातुन या परिसरात 100 टक्‍के घरामंध्‍ये एलपीजी गॅस उपलब्‍ध करून देण्‍याची कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरात सिंचनाच्‍या सोयी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने सुध्‍दा आपण प्रयत्‍नशिल आहोत. 3 कोटी रू. निधी खर्चुन मौलझरी तलावाची विशेष दुरूस्ती करून शेतीला पाणी देण्‍याची व्‍यवस्‍था आपण केली आहे. माजी मालगुजारी तलावांच्‍या विशेष दुरूस्‍तीची कामे पुर्ण केली आहे. महिला बचत गटांना विविध व्‍यवसायांच्‍या माध्‍यमातुन रोजगार उपलब्‍ध करून देण्‍यासाठी आपण प्रयत्‍नशिल आहोत. या परिसरातील झरी पर्यटन केंद्राकरीता 30 लक्ष रू. निधी लवकरच उपलब्‍ध होईल अशी ग्‍वाही अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

देशाचा विकासात महिलांसाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सामाजीक क्षेत्रात काम करत असतांना महिला सशक्षमीकरण हा माझा ध्येय राहीला आहे.या दिशेने आम्ही काम करत असून महिलांना रोजगार देण्यासह विविध क्षेत्रात त्यांना शक्य ती मदत करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहला आहे. आज सावित्रीबाई फुले जंयती निमीत्य महिलांच्या वतीने माझा सत्कार होणे, ही माझ्या कामांची मोठी पावती असल्याचे मि समाजतो हा सत्कार मला समाजात काम करण्याची नवी ताकत देणारा असून माझी जवाबदारी वाढवीणारा आहे. या जवाबदारीचा मी स्विकार करुन कोणत्याही क्षेत्रात काम करत असलेल्या महिलांना कुठलीही अडचण आल्यास भाऊ  म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल अशी ग्राव्ही किशोर जोरगेवार यांनी दिली.
चंद्रपूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत स्वच्छतेसंबंधी जनजागृती मोहीम चंद्रपूर शहर महानगरपालिका सतत राबवीत आहे.

चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चंद्रपूर शहरातील प्रशिक्षणार्थींना रोजगार  स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 

Page 4 of 7
  • 001
  • 002

फोटोगॅलरी

मुलाखत

आरजे शुभम बद्दल आणखी थोडं….

आज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……