चंद्रपूर: जिल्हयात कोळसा खाणींद्वारे शेतक-यांच्या जमीनीचे अधिग्रहण होत असून यात अतिक्रमीत शेतजमिनींचेसुध्दा अधिग्रहण होत असले तरी वेकोलि प्रबंधनाद्वारा केवळ आदिवासी प्रवर्गातील अतिक्रमण धारकांना जमिनीचा मोबदला देण्यात येत असून गैरआदिवासी अतिक्रमण धारकांना मोबदला व अन्य सुविधांपासून वंचित करण्यात येत असल्याने गैर आदिवासी अतिक्रमण धारकांवरील हा अन्याय असल्याने त्यांनाही आदिवासी अतिक्रमण धारकांसारखाच मोबदला व अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी जिल्हा दक्षता व सनियंत्राण समितीचे सदस्य, भाजपा नेते खुशाल बोंडे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
चंद्रपूर: भारतीय स्वातंत्रय संग्राम सेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक देशगौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 122व्या जयंती उत्सव पर्वावर दि. 24 जानेवारी 2019 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू श्री. चंद्रकुमारजी बोस चंद्रपुरात येत असून त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये नेताजींचा जयंती उत्सव व नागरी सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा महानगर चंद्रपूर च्या वतीने दि. 24 जानेवारी रोजी सायं. 6.30 वाजता क्रिष्णानगर, मूल रोड चंद्रपूर येथील दुर्गा मंदिर पटांगणामध्ये आयोजित केलेल्या या समारंभाचे सत्कारमूर्ती म्हणून मा. श्री. चंद्रकुमारजी बोस उपस्थित राहणार आहेत.

दिव्‍यांग व्‍यक्‍तींना स्‍वावलंबी होण्‍याच्‍या दृष्‍टीने हरीत ऊर्जेवर चालणा-या पर्यावरण स्‍नेही फिरत्‍या वाहनावरील दुकान अर्थात मोबाईल शॉप ऑन व्‍हेईकल मोफत उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत आज घेण्‍यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2018-19 चा अर्थसंकल्‍प विधीमंडळात सादर करताना केलेल्‍या घोषणेची पूर्तता झाली आहे.

 ड्रग्सची लत चंद्रपुरातील युवकांचे भविष्य अंधारात झोकत आहे. हा प्रकार डोळ्यांसमोर घडत असतांना डोळे झाक करून गप्प बसने सज्ज नागरिकाचे लक्षण नाही.  याविरोधात लढा उभारून ड्रग्सला चंद्रपुरातून हद्दपार करण्याची गरज आहे. आणि हे तुमच्याशिवाय शक्य नाही. त्यामूळे आता ड्रग्स विरोधातील लढ्यासाठी सज्ज व्हा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी विध्यार्थ्यांना केले. पटेल हायस्कुल अँल्युमनी फाउंडेशन, चंद्रपूर तथा स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, व यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने इंदिरा गांधी प्रियदर्शनी सभागृहात ड्रग्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मागदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी डॉ. सुप्रिया देशमुख यांची मुख्य वक्त्या म्हणून मंचावर उपस्थिती होती.

शिवसेनेचे नेते, माजी जिल्‍हा प्रमुख रमेश तिवारी यांच्‍या निधनाने जनतेच्‍या प्रश्‍नांसाठी सदैव लढणारा कट्टर शिवसैनिक आपण गमावला असल्‍याची शोक संवेदना अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

पटेल हायस्कूल अँल्युमनी फाऊंडेशन चंद्रपूर व स्व .प्रभाताई जोरगेवार चँरिटेबल टस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तथा महाविद्यायीन विद्यार्थी बांधवांवर होत असलेल्या ड्रग्स नावाच्या महा भयंकर राक्षसाबद्दल जनजागृती करण्यासाठी सोमवार दिनांक २१ जानेवरी २०१९ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे चंद्रपूर विद्यार्थी -शिक्षक -पालकांसाठी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलेला आहे.कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन स्व.प्रभाताई जोरगेवार चँरिटेबल टस्ट , चंद्रपूरचे अध्यक्ष किशोर जोरगेवार राहणार आहे. तर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या तथा मार्गदर्शिका म्हणुन डॉ. सुप्रिया देशमुख राहणार आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रांतर्गत रेल्वेशी निगडीत विविध सोयी-सुवीधांच्या उपलब्धतेकरिता तसेच प्रलंबित रेल्वे मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात या क्षेत्राचे खासदार तथा केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी दि. 7 जानेवारी 2019 रोजी मध्य रेल्वेचे तसेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांची संयुक्त बैठक नागपुरातील रवि भवनात घेतली. या बैठकीत रेल्वेशी संबंधित अनेक महत्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा झाली. यावेळी रेल्वे विषयक अनेक सोयी-सुविधांबाबत मंत्राी महोदयांच्या उपस्थितीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. बैठकीस चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे अध्यक्ष रमणीकभाई चव्हाण, झोनल रेल्वे परामर्शदात्राी समितीचे सदस्य दामोदर मंत्राी, एमआयडीसी असो.चे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा, भाजपा नेते विजय राऊत, दक्षिण-मध्य रेल्वे समितीचे सदस्य राहुल सराफ प्रभृती प्रामुख्याने उपस्थित होते.
जिवती: ‘‘विना सहकार, नही उध्दार’’ हे सहकाराचे ब्रिद असून सहकारातूनच समाज, राष्ट्र व आर्थिक उन्नतीला हातभार लागतो या क्षेत्रात सहकार भारतीचे फार मोठे योगदान असून सहकाराचे सर्वत्रा जाळे विणल्या गेले आहे असे प्रतिपादन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक दिशा समितीचे सदस्य खुशाल बोंडे यांनी मारईपाटन या तीर्थक्षेत्राी सहकार विषयक आयोजित कार्यक्रमास संबोधित करतांना केले. या कार्यक्रमाला आदिवासी नेते वाघुजी गेडाम, जि.प. सभापती सौ. गोदावरी केंद्र, भाजपा जिवती तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, भाजपा विस्तारक सतीश दांडगे, भाजपा किसान आघाडी जिल्हा महामंत्राी राजु घरोटे, सुरेशभाऊ केंद्रे, दत्ताजी राठोड, भाऊराव चंदनखेडे, गोपीनाथ चव्हाण, महादेव तपासे, सचिन शेंडे, भारत तेलंग आदी प्रभृतींची उपस्थिती होती.
Page 3 of 7
  • 001
  • 002

फोटोगॅलरी

मुलाखत

आरजे शुभम बद्दल आणखी थोडं….

आज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……

 

Archived News