Friday, 15 February 2019 06:42
एकोरी वार्ड, जलनगरातील भाजपाच्या हळदीकुंकू कार्यक्रमास महिलांची भरगच्च उपस्थिती
चंद्रपूर: माता-भगिनींचा सन्मान हा भारतीय संस्कृति आणि परंपरेचा अविभाज्य भाग असून या चिरंतन संस्कृतीचे जतन करीत स्त्री जातीचा कायम सन्मान राखल्या जावा, स्वरक्षणाची जबाबदारी निभावण्याचे बळ प्राप्त व्हावे, एकसंध महिला शक्तीच्या माध्यमातून महिला हुंकाराचा जागर निर्माण व्हावा यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हळदी कुंकू आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून चंद्रपूर महानगरात भाजपा महिला आघाडी चंद्रपूरच्या विद्यमाने नेहरूनगर, एकोरी वार्ड, जलनगर वार्ड व शहरातील अन्य प्रभागात भव्य महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे दि. 13 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली होती.
Published in
चंद्रपूर
Tagged under
Friday, 15 February 2019 06:36
पंचायत समिती नागभीड परिसरातील जाण्यायेण्याच्या मुख्य रस्त्यासाठी नागरिकांचा एल्गार!
मागील अंदाजे साठ वर्षांपासून पंचायत समिती नागभीड परिसरातील नागरिकांना रहदारीकरिता, पंचायत समितीच्या मुख्य गेट पासून रस्ता आहे, त्याच रस्त्याने आजपर्यंत सगळ्या प्रकारची वहिवाट सुरू आहे, पंचायत समिती नागभीड परिसरात आजपावेतो दोनशेच्यावर पक्की घरे असून दीड ते दोन हजार संख्येची लोकवस्ती आहे तद्वतच या परिसरात आमदार/ खासदार फंडातील सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते असून या परिसराचा बऱ्याच प्रमाणात विकास झालेला आहे.या परिसरात विद्युत महावितरणचे मुख्य कार्यालय असून लहान मुलांची अंगणवाडी सुध्दा आहे.पण पंचायत समिती नागभीड प्रशासनाने या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करून हेकेखोरपणाने संरक्षण भिंतीचे काम सुरू करून आमचा नेहमीचा वाहिवाटीचा रस्ता बंद करण्याचे नियोजन करीत आहे
Published in
चंद्रपूर
Tagged under
Wednesday, 06 February 2019 11:27
चंदनखेडा, घोडपेठ येथे आज भाजप महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम
भद्रावती: भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने दि. 7 फेब्रुवारी 2019 रोजी चंदनखेडा व घोडपेठ येथे तिळसंक्राती निमित्त महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.चंदनखेडा येथे सांय. 5 वाजता हनुमान मंदीराजवळील कृषि भवनात तर घोडपेठ येथे सांय. 7 वाजता किसान भवनात होऊ घातलेल्या या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार आहेत.
Published in
चंद्रपूर
Tagged under
Monday, 04 February 2019 06:24
मोहबाळा गट ग्रा.पं. भवनाचा व पाण्याच्या टाकीचा लोकार्पण
भद्रावती - भद्रावती तालुक्यातील मोहबाळा गट ग्रा.पं. भवनाचा व पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा ना. हंसराजजी अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते संपन्न झाला. ग्रा.पं. भवनाला अंदाजित 11 लक्ष रूपयांचा निधी माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी प्राप्त करून दिला होता सोबतच मोहबाळा गावातील लोकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी 35 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी सुध्दा बांधण्यात आली असून भविष्यात मोहबाळा येथे पाण्याची कमतरता राहणार नाही. लोकार्पण कार्यक्रमात बोलतांना ना. अहीर यांनी मोहबाळा गट ग्रा.पं. मध्ये तीन गावांचा समावेश असून या छोट्याशा गावात इतके सुंदर भवन निर्माण होणे म्हणजे इथल्या जागरूक पदाधिका-यामुळे हे विकासकामे होवू शकते. मागील काळात तलावाचे खोलीकरण, रस्त्याची कामे अशा विविध कामात आम्ही मदत करीत राहतो या ठिकाणी विजय वानखेडे यांनी काही विकासकामे बाकी असल्याचे सांगितले त्यापैकी जि.प. शाळेला संगणक संच व पिण्याच्या पाण्याचे आर.ओ. वाॅटर एटीएम हे आपल्या गावामध्ये लवकरच सुरू करू अशी ग्वाही सुध्दा दिली.
Published in
चंद्रपूर
Tagged under
Monday, 04 February 2019 06:17
इंडियन बुलेट रॅली शक्ती यात्रेचे चंद्रपूरात ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते स्वागत
चंद्रपूर: मिशन मोदी 2019 अंतर्गत बंगलोर येथील लिगल राईटस् कौन्सील इंडिया व टिम भारत यांच्या सहयोगातून आॅल इंडिया बुलेट रॅली ही देशातील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरीयाणा व दिल्ली या 8 राज्यांमधुन ’शक्ती यात्रा’ प्रवास करित आहे. याचं नेतृत्व राजलक्ष्मी नंदा ही महिला करीत असुन बुलेट ने प्रवास करून ही यात्रा पुर्ण करणार आहे. दि. 02 रोजी या बुलेट स्वार महिला व अन्य सहकाÚयांचे चंद्रपूर नगरीत केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी स्वागत केले व पुढील यात्रेसाठी हिरवी झेंडी दाखवुन शुभेच्छा दिल्या.स्थानिक गिरणार चैक येथील भाजपा कार्यालयासमोर ’शक्ती यात्रेचे’ स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, चंद्रपूरचे उपमहापौर अनिल फुलझेले, झोन सभापती स्वामी कनकम, नगरसेविका सौ. कल्पना बगुलकर, सौ. ज्योती गेडाम, सौ. वनंदा तिखे, मंडळ अध्यक्ष संदिप आगलावे, मंडळ अध्यक्ष राजेंद्र तिवारी, मंडळ अध्यक्ष प्रमोद शास्त्रकार, पुनम तिवारी आदींची उपस्थिती होती.
Published in
चंद्रपूर
Tagged under
Monday, 04 February 2019 06:08
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात दरमहा 6 हजारांची वाढ
चंद्रपूर:- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केद्रातील प्रकल्पग्रस्तांना मोबदला, रोजगार व सन्मानजनक मानधन मिळावे याकरिता केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नेहमीच सकारात्मक भुमीकेतून पुढाकार घेत शासन दरबारातून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. महाऔष्णिक विद्युत केद्रात प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली यासाठी ना. हंसराज अहीर यांचे विशेष प्रयत्न असतांना या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी विविध बैठकीच्या व चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा मांडला होता. या प्रयत्नांचे फलीत म्हणजे आज प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात दरमहा तब्बल 6 हजार रूपये वाढीचा निर्णय घेण्यात आला करिता आम्ही ना. अहीर यांचे स्वागत करीत असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
Published in
चंद्रपूर
Tagged under
Saturday, 02 February 2019 07:04
शेतकरी, कामगार व मध्यम वर्गाचे जिवनमान समृध्द करणारा अर्थसंकल्प - ना. हंसराज अहीर
चंद्रपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या अंतरीम बजेटमधे देशातील सर्व वर्गांचा विचार करून त्यांचा विकास सुनिष्चीत करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सरकारने यापुर्वी शेतकत्यांचे जिवनमान समृध्द करण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. त्यात आता 5 एकर पर्यंत षेती असणाया शेतकयांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्शी 6 हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. यामुळे अल्प भूधारक च्या प्रसंगी शेतक-यांच्या व्याजात 5 टक्क्यांची सुट देण्यामुळे शेतकÚयांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. या सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी 60 वर्शांनंतर 3 हजार रूपये निवृत्ती वेतन योजना, लघु उद्योगांना 1 कोटी रूपयांचे कर्ज, न्युनतम वेतना 10 हजारावरून 21 हजार रूपयांपर्यंत वाढ यासारख निर्णय घेतले.
Published in
चंद्रपूर
Tagged under
Saturday, 02 February 2019 06:40
शाळा व्यवस्थापणाने चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ थांबवावा - किशोर जोरगेवार स्कुल बसेचची तात्काळ तपासणी करा, जिल्हाधिका-यांना निवेदन
खाजगी शाळा महागडी फी घेत असली तरी त्या मोबदल्यात विदयार्थ्यांना सोयी सुविधा पूरवत नसल्याचे मागील दिवसांच्या दुर्दैवी अणुभवातून दिसून येत आहे. या शाळांच्या बसेसवर चालक आणि वाहण असलेल्यांना योग्य प्रशिक्षण न देता त्यांची भरती केल्या जात आहे. त्यामूळेही अणेक अपघातांच्या घटणा घडत आहे. महागडी फी देवूनही जर विदयार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळल्या जात असेल तर हे खपवून घेतल्या जणार नाही असा ईशारा देत तात्काळ स्कुल बसेचची तपासणी करुन विदयार्थ्यांना योग्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी केली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिका-यांना पाठवण्यात आले आहे.
Published in
चंद्रपूर
Tagged under