किशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई जोरगेवार यांना ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला आहे या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते तसेच बुरुड समाजाचे भूषण खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गंगुबाई जोरगेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विकास नागे, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैजंतीताई खैरे, सरचिटणीस एम.बी.साळुंखे, विदर्भ प्रांत बुरुड समाज अध्यक्ष किशोर जोरगेवार, विकास सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.             

 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी काळा बिबट आढळल्याने पर्यटकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. यावरून सोशल मिडियावरही बराच खल झाला. ताडोबातील कॅमेऱ्यातही हा बिबट कैद झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा बिबट बुधवारी पुन्हा याच परिसरात श्वेताकुमार रंगाराव बोब्बीली यांना दिसला. त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले.