प्रहार संघटणेत काम करतांना पप्पू देशमुख यांनी पक्ष वाढवीण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या कामाचे कौतुक आहे. परंतु पक्षा अंतर्गत वाद बैठकीतून न सोडवीता पत्रकार परिषदेत मांडत राजीणामा दिला हे मात्र पक्षासाठी दुःखदायक असल्याचेही प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांनी चांदा मिररशी बोलतांना म्हटले. 

                                                     

पप्पु देशमुख यांच्या राजीणाम्या नंतर आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली त्यासाठी ते आज चंद्रपूरात आले होते. या बैठकीत संपुर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून नव्या पदाधिका-यांची नेमणुकही करण्यात आली असल्याची माहीती चांदा मिररशी बोलतांना कुदळे यांनी दिली.

                                                           

पप्पु देशमुख यांच्या राजीणाम्या नंतर प्रहार जनशक्ती पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पक्षबांधनीकरीता आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक पुर्व नियोजीत असल्याचे सांगीतल्या जात असले तरी या बैठकीला पप्पू देशमुख यांच्या राजीणाम्याची पार्श्वभूमी आहे. पक्षात काम काम करत असतांना पप्पू देशमूख यांनी चांगले काम केले. त्यामूळे जिल्ह्यात पक्षाची चांगली स्थिती आहे. अश्या शब्दात प्रमोद कुदळे यांनी पप्पू देशमूख यांचे कौतूक केले. मात्र पप्पू देशमूख यांनी पक्षावर लावलेल्या आरोपाचे खंडण करत पक्षात नवीन चेहरे काम करण्यासाठी तयार आहे. अणेक तालुक्यात नवनियुकत्या करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगीतले.

 

  विविध आंदोलन करुन त्यात यश मिळवत प्रहार संघटणेचा जिल्ह्यात विस्तार करणा-या पप्पू देशमूख यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीणामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षात असामाजीक तत्वांचा प्रवेश होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या करणाने मी राजीणामा देत असल्याचे त्यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. तसेच संपुर्ण जिल्ह्याची टिम माझ्या सोबत असल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला.

आजी आणि तीच्या पाच वर्षीय नातीनची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज चंद्रपूरातील बालाजी वार्डात घडली. या घटणेमूळे शहरात खळबळ उडाली असूल शहर पोलिस या घटणेचा तपास करीत आहे. या प्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेण्यात आली असल्याचीही माहीती आहे. असे असले तरी या हत्याकांडामागचे कारण अदयापतरी स्पष्ट झालेल नाही. सूशिला कैलाश पिंपळकर वय 52 वर्षे असे मृत आजीचे नाव आहे.

 गणेश चतुर्थी पासुन शहरात सार्वजनिक उत्सवांची धुम सुरु आहे. अश्या सार्वजनिक उत्सवात विविध सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करुन समाजात सामजिक बांधिलकी  निमार्ण करण्याची गरज असल्याचे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. आंनदनगर महिला मंडळाच्या वतीने नवरात्रीउत्सवा निमीत्य विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा काल रविवारी थाठात पार पडला. यावेळ ते बोलत होते. या कार्यक्रमाला आंनदनगर महिला मंडळच्या अध्यक्षा जयश्री शहायांची अध्यक्षस्थानी तर संतोश खांडरेतहसिलदार चंद्रपूरराजू हनमंतेअध्यक्षआनंदनगर बहुउद्देशिय मंडळविजय चंदावारअध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघकेशवराव जेनेकरसचिव ज्येष्ठ नागरिक संघ,  भारती दुढानीमहिला जिल्हा प्रमूखशिवसेना आदिं मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

चंद्रपूर - हळस्ती गावातील वर्धा नदी पात्रात 45 वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळला असून पोलिसांनी मृतदेह नदिपात्रातून बाहेर काढून तपास सुरु केला. असे असले तरी अदयापही मृतकाची ओळख पटलेली नाही.

आज चंद्रपूर महागनर पालिकेची आमसभा पाणी समस्येच्या प्रश्नावर चांगलीच गाजली जनु महानगर पालिका सभागृह कुस्तीचा आखाडा बनला की काय असे चित्र निर्माण झाले होते. महापौर पाणी दया अश्या घोषणा करत नगरसेवक नंदु नागरकर यांनी रिकामी मडकी सभागृहात फोडली त्यानंतर संतप्त झालेल्या भाजपचे सभागृह नेते वसंता देशमुख यांनी नंदु नागरकर यांना धक्काबुक्की केली. ईतर नगर सेवकांच्या मध्यस्थी केली मात्र हा वाद मिटन्या एवजी आणखी चीघळताना पाहून अर्ध्या तासासाठी साभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे मनपाचे पवित्र सभागृह कुस्तिच्या आखाड्यात रुपांतरीत झाल्याचे दिसून आले.

पाणी प्रश्नावरुन किशोर जोरगेवार यांनी काल केलेल्या आंदोलना नंतर आज कॉग्रेसही आग्रमक झाली असून आज आयोजीत मनपाच्या सर्व साधारन सभेत मनपा नगर सेवकांनी चांगलाच गधारोड केला. यावेळी रिकामी मडकी घेऊन महापौर पाणी दया अश्या घोषणा करत सभागृहातच मडकी फोडली. त्यामूळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता. मनपा बाहेर ही क्रॉंग्रेसच्या नगरसेवकांनी डपरे वाजवत मनपाचा जोरदार निषेध केला.

शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले असून संपुर्ण शहरवासीयांची पाण्यासाठी चांगलीच पायपीठ सुरु आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असतांनाही फक्त कंत्राटदाराला फायदा पोहचवीण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट चंद्रपूरकरांवर लादत आहे. हा नागरिकांवर अन्याय असून हा अन्याय सहन करणार नाही असा ईशारा देत आज किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांचा मोर्चा महानगर पालिकेवर धडकला. यावेळी मनपा आयुक्तांना पाणी पुरवठा तात्काळ नियमीत सुरु करण्यात यावा या मागणीचे निवेदण देण्यात आले. आयुक्तांनीही आंदोलनाची दखल घेत 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले आहे. मात्र 1 तारखेपासून पाणी पूरवठा नियमीत न झाल्यास महानगर पालीका जलयम करुन अधिका-यांना खुर्च्यांवर बसू देणार नाही असा ईशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.

 आज भर दुपारी सहा ते सात शस्त्रधारी युवकांनी शस्त्राच्या धाकाने एकोरी वार्डातील दुकाने बंद करत जवळपास अर्धा तास धुमाकूळ घातला विशेष म्हणजे घुटकाळा पोलिस चौकी समोर हा प्रकार सुरु होता. तसेच या युवकांनी  शाळेतील विदयार्थी घेऊन येत असलेल्या एका आटोचीही तोडफोड केल्याची माहीती आहे. अदयाप या प्रकरणी कोणीही तक्रार केली नसली तरी पोलिसांनी या युवकांचा शोध घेणे सूरु केला आहे. तर दोघांणा ताब्यात घेण्यात आल्याचीही माहीती आहे. 

 सिंदेवाही तालूक्यातील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांना दोन लाख रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. विषेश म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री या सिंदेवाही नगर पारिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष आहे.