धारीवाल कंपणीवरील मोर्चासाठी जोरगेवारांसह प्रशासनही सज्ज - मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता, चंद्रपूरकरांसह राजकीय पक्षांचेही मोर्चाकडे लक्ष. Featured

Saturday, 02 March 2019 06:19 Written by  Published in चंद्रपूर Read 89 times

बेरोजगारांना रोजगार दया या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी आज किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धारीवाल कंपणीवर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  त्या पार्श्वभुमीवर किशोर जोरगेवारांसह पोलिस प्रशासनही मोर्चासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. मोर्चाच्या मार्गावर पोलिस कर्मचाÚयांची तैणाती करण्यात आली आहे. तर मोर्चात कोणताही अनूचित प्रकार घडु नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने जोरगेवारांना नोटीस बजवाण्यात आला आहे

  बेरोजगारांना रोजगार द्या या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी आज किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धारीवाल कंपणीवर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभुमीवर किशोर जोरगेवारांसह पोलिस प्रशासनही मोर्चासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. मोर्चाच्या मार्गावर पोलिस कर्मचाÚयांची तैणाती करण्यात आली आहे. तर मोर्चात कोणताही अनूचित प्रकार घडु नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने जोरगेवारांना नोटीस बजवाण्यात आला आहे.स्थानिक नागरिकांनाच नौकरी देण्यात यावी, सी.एस.आर. फंडाचे वापर युवकांचे व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी करण्यात यावे, अवैधरीत्या होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी, प्रदूषन रोखन्याकरीता उपाययोजना करण्यात याव्या, प्रदूशनामुळे होणाÚया शेतपिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. येथे कार्यरत कामगारांना वेतन वाढ देवून सुरक्षा साधने उपलब्ध करुन देण्यात यावी, कंपनीने येथील नागरिकांना निम्य दर्जाची वागणूक देने बंद करावे, कंपणी सुरु होतांना गावकÚयांना दिलेल्या आश्वासनांची कंपणी व्यवस्थापणाने पूर्तता करावी, या मागण्यासाठी आज 2 मार्च ला दूपारी 1 वाजता सामजिक कार्यकर्ते किषोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धारिवाल कंपनीवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सूरूवात गांधी चौक येथून बाईक रॅलीने होणार असून यात बैलबंड्याचाही समावेश राहणार आहे. ही रॅली ताडाळी टी पाईंट जवळ पोहचल्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे. तेथून मुख्य मोर्चाला सूरूवात होणार असून हा मोर्चा थेट धारिवाल कंपनीवर धडकणार असून यावेळी कंपनी व्यवस्थापनाला मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे.  या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रशासन पुर्णपणे सज्ज झाले आहे. जोरगेवारांनीही मोर्चासाठी पुर्ण तयारी केल्याचे दिसून येत असून या मोर्चा कडे चंद्रपूरकरांसह राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे.

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.