चंद्रपूर शहरात ३६,६६७ बालकांचे करण्यात येणार लसीकरण Featured

Thursday, 21 February 2019 14:42 Written by  Published in चंद्रपूर Read 52 times

 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे येत्या१० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहेयासंदर्भात मनपा स्तरीय समन्वय समितीची बैठक उपायुक्त श्री. गजानन बोकडे यांच्या अध्यक्षतेखाली दि२० फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडली.

 तुकूम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  १० मार्च रोजी सकाळी  वाजता लसीकरण मोहिमेचे उदघाटनहोणार आहेचंद्रपूर शहरातील  ते  वर्षाच्या ८४,७१४  बालकांचे सकाळी  ते दुपारी  दरम्यान लसीकरण करण्यात येणार आहे.  

      पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्याच्या हेतूने सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेतसेच नियमित लसीकरण.एफ.पी.  सर्वेक्षण  पोलिओ रुग्ण आढळल्यास नियोजनाबद्ध  लसीकरणामुळे जानेवारी २०११ पासून भारतामधे एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाहीसद्य परिस्थितीत जगात एकूण ३३ पोलिओचे रुग्ण आहेतज्यात पाकिस्तान येथे १२  अफगाणिस्तान येथे २१ रुग्ण २०१८ ला आढळूनआले आहेतपाकिस्तान  अफगाणिस्तान भारताचे शेजारी देश असल्याकारणाने पोलिओ संसर्गीकरणाचा धोका भारताला अजूनही आहे त्यामुळे पोलिओ निर्मूलन मोहीम सतत राबविणे गरजेचे आहे.       

चंद्रपूर महापालिकेच्यावतीने  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असूनया मोहिमेंतर्गत एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता घेण्यात येणारआहेया दिवशी चंद्रपूर महापालिका कार्यक्षेत्रात शाळासमाज मंदिरअंगणवाडीदवाखानेइत्यादी ठिकाणी शहरात विविध ठिकाणी १३२ तात्पुरती लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत्यानंतर दिनांक १२ मार्च ते१४ मार्च या कालावधीत घरोघरी भेटीद्वारे उर्वरित बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे.

   मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोज द्यावाअसे आवाहन महापौर सौअंजली घोटेकर  आयुक्त संजय काकडे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.  

   याप्रसंगी उपायुक्त श्रीगजानन बोकडेसहायक आयुक्त सौशीतल वाकडेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉअंजली आंबटकरवैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ  नितीन कापसे , डॉफुलचंद मेश्रामवैद्यकीय महाविद्यालयातर्फे  रोटरी क्लबचे प्रतिनिधीडब्ल्यू सी एल चे प्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.