चंद्रपूरने लढवय्या नेता गमावला - किशोर जोरगेवार Featured

Wednesday, 20 February 2019 11:47 Written by  Published in चंद्रपूर Read 120 times
कॉम्रेड गणपतराव अमृतकर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी असून त्यांच्या निधनाने चंद्रपूरने लढवय्या नेतृत्व गमावले अशी शोक संवदेना किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली
  कॉंम्रेड गणपतरा अमृतकर यांचे आज वयाच्या 90 व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी चंद्रपूरातील अनेक विषयांना स्पर्ष करत आंदोलने केली. विषय मार्गी लागेपर्य त्याचा पाठपुरावा करणार अस एक लढवय्या नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. बालपणापासून मी त्यांचे कार्य पहात आलोय, अतिषय मनमिळावू स्वभाव अणि जनतेच्या समस्या सोडवीण्याची त्यांची तडमळ यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. माझ्या सामजीक कार्यातही अनेकदा त्यांचे मला मागर्दर्शन लाभले. त्यामुळे त्यांच्या निधनाने राजकारणासह समाजीक क्षेत्राचीही मोठी हाणी झाली असून चंद्रपूरने एक लढवय्या नेता कायमचा गमावला आहे.
Last modified on Thursday, 21 February 2019 14:40
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.