एकोरी वार्ड, जलनगरातील भाजपाच्या हळदीकुंकू कार्यक्रमास महिलांची भरगच्च उपस्थिती Featured

Friday, 15 February 2019 06:42 Written by  Published in चंद्रपूर Read 54 times
चंद्रपूर: माता-भगिनींचा सन्मान हा भारतीय संस्कृति आणि परंपरेचा अविभाज्य भाग असून या चिरंतन संस्कृतीचे जतन करीत स्त्री जातीचा कायम सन्मान राखल्या जावा, स्वरक्षणाची जबाबदारी निभावण्याचे बळ प्राप्त व्हावे, एकसंध महिला शक्तीच्या माध्यमातून महिला हुंकाराचा जागर निर्माण व्हावा यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हळदी कुंकू आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून चंद्रपूर महानगरात भाजपा महिला आघाडी चंद्रपूरच्या विद्यमाने नेहरूनगर, एकोरी वार्ड, जलनगर वार्ड व शहरातील अन्य प्रभागात भव्य महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे दि. 13 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमास चंद्रपुरच्या महापौर सौ. अंजलीताई घोटेकर, म.प्र. महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वनिताताई कानडे, भाजपा जिल्हा महासचिव राहुल सराफ, भाजयुमोचे युवा नेता मोहन चैधरी, नगरसेवक अॅड. राहुल घोटेकर, अंकुश सावसाकडे, रवि आसवानी, राजु येले, झोन सभापती मायाताई उईके, यांचेसह नगरसेविका वनिता डुकरे, शितल गुरनुले,  रत्नमाला वायकर, शिलाताई चव्हाण, उषाताई उराडे, सविताताई कांबळे, चंद्रकलाताई सोयाम, वंदनाताई जांभुळकर, अनुराधाताई हजारे, सौ. प्रभाताई गुडधे, घोडेस्वार ताई, शुभांगीताई दिकोंडवार, सौ. उमाबाई खोलापुरे, सुनिताताई कागदेलवार, मोनिषाताई महातव, प्रियाताई नांदे, सौ. स्मीताताई नंदनवार यांचेसह शेकडो माता भगिनींची उपस्थिती होती. या प्रसंगी महापौर अंजलीताई घोटेकर यांनी महिलांच्या संरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने कडक कायदे केले असून राज्य सरकारने या कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी सुरू केल्याने महिलांवरील अन्याय, अत्याचारांच्या घटनांमध्ये आमुलाग्र घट झाली आहे असे सांगितले. महिलांचे सक्षमीकरण, महिलांना रोजगार, स्वयंरोजगार, महिलांचे ऐक्य, त्यांचे न्याय अधिकार विविध क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने सुसंधी देवून भक्कम अशी महिला शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपनित केंद्र व राज्य सरकारच्या राजवटीत झाल्याने आज महिलांसाठी कोणतेही क्षेत्रा वज्र्य राहिले नाही असे त्या म्हणाल्या. सौ. वनिताताई कानडे यांनी सांगितले की, भाजपा हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. महिलांचे रक्षण, संरक्षण व सन्मान हे खÚया अर्थाने भाजपामध्येच होते त्यामुळे महिलांची सुरक्षितता या पक्षात अबादीत आहे. या जिल्हयातील भाजपा लोकप्रतिनिधींनी महिलांच्या कल्याणाचे अनेक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवून महिला शक्तींचे मनोबल वाढविले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमातील महिलांची भरगच्च उपस्थिती ही सुध्दा भाजपावरील अढळ विश्वासाचे प्रतिक आहे असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी राहुल सराफ यांनीही केंद्र व राज्य सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी उपस्थित महिलांना हळदीकंुकू कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतांना या कार्यक्रमातून महिलांच्या भावभावनांचे प्रतिबिंब उमटेल असा विश्वास व्यक्त केला. सदर कार्यक्रमास उपस्थित माता भगिनींना हळदीकुंकू लावून वानाचे (भेटवस्तु) वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वच स्तरातील महिलांची मोठया संख्येत उपस्थिती होती. 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.