पंचायत समिती नागभीड परिसरातील जाण्यायेण्याच्या मुख्य रस्त्यासाठी नागरिकांचा एल्गार! Featured

Friday, 15 February 2019 06:36 Written by  Published in चंद्रपूर Read 55 times
मागील अंदाजे साठ वर्षांपासून पंचायत समिती नागभीड परिसरातील नागरिकांना रहदारीकरिता, पंचायत समितीच्या मुख्य गेट पासून रस्ता आहे, त्याच रस्त्याने आजपर्यंत सगळ्या प्रकारची वहिवाट सुरू आहे, पंचायत समिती नागभीड परिसरात आजपावेतो दोनशेच्यावर पक्की घरे असून दीड ते दोन हजार संख्येची लोकवस्ती आहे तद्वतच या परिसरात आमदार/ खासदार फंडातील सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते असून या परिसराचा बऱ्याच प्रमाणात विकास झालेला आहे.या परिसरात विद्युत महावितरणचे मुख्य कार्यालय असून लहान मुलांची अंगणवाडी सुध्दा आहे.पण पंचायत समिती नागभीड प्रशासनाने या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करून हेकेखोरपणाने संरक्षण भिंतीचे काम सुरू करून आमचा नेहमीचा वाहिवाटीचा रस्ता बंद करण्याचे नियोजन करीत आहे
असे निदर्शनास आले आहे.त्यामुळे पंचायत समिती परिसरातील नागरिकांमध्ये उद्वेगाची भावना असून, सदर परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आणि त्यांनी पंचायत समिती विराधात एल्गार पुकारलेला आहे. परिसरातील नागरिकांनी या संबंधीचे निवेदन, मा. आमदार श्री. किर्तीकुमार भंगाडीया, मा. मुख्याधिकारी नगर परिषद नागभीड, मुख्य कार्यपालन अधिकारी जि. प. चंद्रपूर, संवर्ग विकास अधिकारी, पं. स. नागभीड व इतर संबंधित अधिकारी तसेच पदाधिकारी यांना उचित कारवाईस सादर केले आहे. तरी प्रशासनाने आमच्या नेहमीचा मुख्य असाच सुरू ठेवावा ही आम्हां नागरिकांची मागणी आहे.असे पंचायत समिती परिसरातील नागरिकांचे वतीने, श्री. मनोज लडके, श्रीकांत पिसे, श्री.रायभान पाथोडे, गुड्डू वाढई, वैभव पिसे, प्रशांत गजभे, नंदू डोईजड, संजय डोंगरावर, आशिष बावनकर, अनिल टिपले, आशिष मिसार, कैलाश बोरीकर, पंकज फटींग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.