चंदनखेडा, घोडपेठ येथे आज भाजप महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम Featured

Wednesday, 06 February 2019 11:27 Written by  Published in चंद्रपूर Read 17 times
भद्रावती: भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने दि. 7 फेब्रुवारी 2019 रोजी चंदनखेडा व घोडपेठ येथे तिळसंक्राती निमित्त महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.चंदनखेडा येथे सांय. 5 वाजता हनुमान मंदीराजवळील कृषि भवनात तर घोडपेठ येथे सांय. 7 वाजता किसान भवनात होऊ घातलेल्या या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास पुर्व पालकमंत्री संजय देवतळे, वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, जिल्हा महामंत्री राहूल सराफ, डाॅ. भगवान गायकवाड, भाजपा उपाध्यक्ष डाॅ. अनिल बुजोणे, राजु गायकवाड, भद्रावती तालुकाध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, जि.प. सभापती सौ. अर्चना जिवतोडे, महिला प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेणुका दुधे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, भाजपा तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, शेखर चैधरी, ओमप्रकाश मांडवकर, पं.स. सभापती सौ. विद्या कांबळे, भाजपा नेते चंद्रकांत गुंडावार, अशोक हजारे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. लता भोयर, चंदनखेडा सरपंच सौ. गायत्री बागेसर, निळकंठ सोनकुसरे, घोडपेठच्या सरपंच सौ. वैशाली उरकुडे, लोणारा सरपंच सौ. सिंधुताई चवटे, पुर्व जि.प. सदस्या सौ. शिला पारखी आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख कार्याची तसेच योजनांची माहिती उपस्थित मान्यवरांकडून देण्यात येणार आहे.
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.