मोहबाळा गट ग्रा.पं. भवनाचा व पाण्याच्या टाकीचा लोकार्पण Featured

Monday, 04 February 2019 06:24 Written by  Published in चंद्रपूर Read 13 times
भद्रावती - भद्रावती तालुक्यातील मोहबाळा गट ग्रा.पं. भवनाचा व पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा ना. हंसराजजी अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते संपन्न झाला. ग्रा.पं. भवनाला अंदाजित 11 लक्ष रूपयांचा निधी माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी प्राप्त करून दिला होता सोबतच मोहबाळा गावातील लोकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी 35 हजार लीटर क्षमतेची  पाण्याची टाकी सुध्दा बांधण्यात आली असून भविष्यात मोहबाळा येथे पाण्याची कमतरता राहणार नाही. लोकार्पण कार्यक्रमात बोलतांना ना. अहीर यांनी मोहबाळा गट ग्रा.पं. मध्ये तीन गावांचा समावेश असून या छोट्याशा गावात इतके सुंदर भवन निर्माण होणे म्हणजे इथल्या जागरूक पदाधिका-यामुळे हे विकासकामे होवू शकते. मागील काळात तलावाचे खोलीकरण, रस्त्याची कामे अशा विविध कामात आम्ही मदत करीत राहतो या ठिकाणी विजय वानखेडे यांनी काही विकासकामे बाकी असल्याचे सांगितले त्यापैकी जि.प. शाळेला संगणक संच व पिण्याच्या पाण्याचे आर.ओ. वाॅटर एटीएम हे आपल्या गावामध्ये लवकरच सुरू करू अशी ग्वाही सुध्दा दिली.
या कार्यक्रमास माजी पालमंत्री संजय देवतळे, जि.प. सदस्य यशवंत वाघ, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, सरपंच सौ. सिंधू चवरे, उपसरपंच सिध्दार्थ पेटकर, माजी जि.प. सदस्या शिलाताई पारखी, भाजपा भद्रावती शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, अफजल भाई, संजय पारखी, ग्रामसेविका सौ. रजनी घुगुल, ग्रा.पं. सदस्या पिंगला पेटकर, रजनिकांत परचाके, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष राजू मशारकर, सारीका कोमताडे, सौ. प्रगती गेडाम, जिविततोष बिस्वास, विठ्ठल चवरे, सुधाकर परचाके, सौ. संगीता उईके, सौरभ बच्चूवार, विनोद साखरकर, उत्तम आवारी, मुरलीधर रंगारी, सावकार साव, पाणी पुरवठा अधिकरी पराते साहेब, किशोर गोवारदीपे, पो.पा. रामटेके, राहुल चुनारकर आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी सेवानिवृत्त ग्रा.पं. परिचर हरिदास कराडे यांचा मा.ना. हंसराज अहीर व माजी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच सरपंच व उपसरपंच यांचा सुध्दा पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.