इंडियन बुलेट रॅली शक्ती यात्रेचे चंद्रपूरात ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते स्वागत Featured

Monday, 04 February 2019 06:17 Written by  Published in चंद्रपूर Read 20 times
चंद्रपूर: मिशन मोदी 2019 अंतर्गत बंगलोर येथील लिगल राईटस् कौन्सील इंडिया व टिम भारत यांच्या सहयोगातून आॅल इंडिया बुलेट रॅली ही देशातील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरीयाणा व दिल्ली या 8 राज्यांमधुन ’शक्ती यात्रा’ प्रवास करित आहे. याचं नेतृत्व राजलक्ष्मी नंदा ही महिला करीत असुन बुलेट ने प्रवास करून ही यात्रा पुर्ण करणार आहे. दि. 02 रोजी या बुलेट स्वार महिला व अन्य सहकाÚयांचे चंद्रपूर नगरीत केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी स्वागत केले व पुढील यात्रेसाठी हिरवी झेंडी दाखवुन शुभेच्छा दिल्या.स्थानिक गिरणार चैक येथील भाजपा कार्यालयासमोर ’शक्ती यात्रेचे’ स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, चंद्रपूरचे उपमहापौर अनिल फुलझेले, झोन सभापती स्वामी कनकम, नगरसेविका सौ. कल्पना बगुलकर, सौ. ज्योती गेडाम, सौ. वनंदा तिखे, मंडळ अध्यक्ष संदिप आगलावे, मंडळ अध्यक्ष राजेंद्र तिवारी, मंडळ अध्यक्ष प्रमोद शास्त्रकार, पुनम तिवारी आदींची उपस्थिती होती. 
’कहो दिल से, मोदीजी फिर से’ चा नारा देत कर्नाटक ते दिल्ली अशी 8 राज्यांतून ’शक्ती यात्रा’ फिरणार असुन 8 राज्यात 55 दिवसात 15,225 किमी चा दि. 15 जानेवारी ते 13 मार्च 2019 असा प्रवास करणार आहे. यावेळी 155 जिल्हîांना भेटी देत मोदी सरकारच्या कार्यकाळात राबविण्यात येत असलेल्या योजना व लोकाभिमुख निर्णय सामान्य लोकांपर्यत पोहचविण्याचे कार्य या यात्रेतून होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भारतीय जनता पार्टीचे जनसमर्थन   अधिक दृढ करण्याच्या उद्देशातून ही यात्रा प्रवास करणार आहे.प्रसंगी ना. अहीर यांनी बुलेटस्वार राजलक्ष्मी नंदा व त्यांच्या सहकाÚयाचे स्वागत केले. तसेच त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत त्यांच्या मिशन मोदी 2019 या ’शक्ती यात्रेचे’ कौतूक केले.

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.