चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात दरमहा 6 हजारांची वाढ Featured

Monday, 04 February 2019 06:08 Written by  Published in चंद्रपूर Read 13 times
चंद्रपूर:- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केद्रातील प्रकल्पग्रस्तांना मोबदला, रोजगार व सन्मानजनक मानधन मिळावे याकरिता केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नेहमीच सकारात्मक भुमीकेतून पुढाकार घेत शासन दरबारातून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. महाऔष्णिक विद्युत केद्रात प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली यासाठी ना. हंसराज अहीर यांचे विशेष प्रयत्न असतांना या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी विविध बैठकीच्या व चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा मांडला होता. या प्रयत्नांचे फलीत म्हणजे आज प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात दरमहा तब्बल 6 हजार रूपये वाढीचा निर्णय घेण्यात आला करिता आम्ही ना. अहीर यांचे स्वागत करीत असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
ना. हंसराज अहीर यांचा सन्मान प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल समितीच्या वतिने करण्यात आला. प्रसंगी समितीचे संजय ठाकरे, महादेव डुडूरे, दिवाकर मांडवगुडधे, चेतन देवतळे, अश्विन देवतळे, श्रीकांत शेेंडे आदी पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात दरमहा 6 हजार रूपयांची वाढ करण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत ना. अहीर यांनी सांगीतले की, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींचे अनेक प्रश्न हे प्रलंबीत होते परंतु भाजप प्रणीत सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेतून अनेक प्रश्न संपुष्टात आले आहे. भविष्यात देखील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व समस्यांच्या सोडवणुकीसाठी असे सकारात्मक व स्वागतार्ह निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतल्या जाईल असा विश्वास ना. अहीर यांनी यावेळी व्यक्त केला व राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हा निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.