शेतकरी, कामगार व मध्यम वर्गाचे जिवनमान समृध्द करणारा अर्थसंकल्प - ना. हंसराज अहीर Featured

Saturday, 02 February 2019 07:04 Written by  Published in चंद्रपूर Read 19 times
चंद्रपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या अंतरीम बजेटमधे देशातील सर्व वर्गांचा विचार करून त्यांचा विकास सुनिष्चीत करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सरकारने यापुर्वी शेतकत्यांचे जिवनमान समृध्द करण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. त्यात आता 5 एकर पर्यंत षेती असणाया शेतकयांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्शी 6 हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. यामुळे अल्प भूधारक च्या प्रसंगी शेतक-यांच्या व्याजात 5 टक्क्यांची सुट देण्यामुळे शेतकÚयांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. या सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी 60 वर्शांनंतर 3 हजार रूपये निवृत्ती वेतन योजना, लघु उद्योगांना 1 कोटी रूपयांचे कर्ज, न्युनतम वेतना 10 हजारावरून 21 हजार रूपयांपर्यंत वाढ यासारख निर्णय घेतले.
सर्वात महत्वाचे म्हणजे देशातील 3 कोटी मध्यम वर्गीय व नोकरदार वर्गीयांना आयकरात 5 लाखाची सिमा वाढवुन दिल्याने त्यांना हा मोठा दिलासा देण्याचे कार्य केले आहे. या अंतरिम बजेट मुळे देशातील शेतकरी, कामगार, महिला, मध्यम वर्गीय व ज्येेेेष्‍‍‍ठ ना मोठा फायदा करून दिल्यामुळे देशाची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. यामुळेच भारत जगातील अर्थव्यवस्थेत 10 व्या क्रमांकावरून 6 व्या क्रमांकावर पोहचला आहे. देशातील सर्वांचा विचार करून सर्व वर्गांना सशक्त करण्याचा संकल्प या अंदाजपत्रकातून दिसुन येत असल्याने या अंदाजपत्राकाचे स्वागत करून पंतप्रधान मोदी यांच्या नेत्वृत्वात देश जागतीक क्ती म्हणुन उदयाला येईल.
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.