शाळा व्यवस्थापणाने चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ थांबवावा - किशोर जोरगेवार स्कुल बसेचची तात्काळ तपासणी करा, जिल्हाधिका-यांना निवेदन Featured

Saturday, 02 February 2019 06:40 Written by  Published in चंद्रपूर Read 18 times

खाजगी शाळा महागडी फी घेत असली तरी त्या मोबदल्यात विदयार्थ्यांना सोयी सुविधा पूरवत नसल्याचे मागील दिवसांच्या दुर्दैवी अणुभवातून दिसून येत आहे. या शाळांच्या बसेसवर चालक आणि वाहण असलेल्यांना योग्य प्रशिक्षण न देता त्यांची भरती केल्या जात आहे. त्यामूळेही अणेक अपघातांच्या घटणा घडत आहे. महागडी फी देवूनही जर विदयार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळल्या जात असेल तर हे खपवून घेतल्या जणार नाही असा ईशारा देत तात्काळ स्कुल बसेचची तपासणी करुन विदयार्थ्यांना योग्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी केली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिका-यांना पाठवण्यात आले आहे. 

शिक्षणाचे खाजगी करण झाल्यापासून शिक्षण महागडे झाले आहे. या शर्यतीच्या स्पर्धेत पालकही महागडी फि देवून मुलाला उत्तम शिक्षण घेता येईल या आशेने खाजगी शाळांमध्ये पाठवत आहे. मात्र आता त्यांचा मुलगा किती सुरक्षीत आहे. अशी भिती मागील काही घटणांमुळे पाल्यांना धास्तावत आहे. नुकत्याच काल घडलेल्या दुर्दैवी घटणेत चुकल्याला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे पालकवर्गात भिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षीतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची पुर्ण जबाबदारी स्विकारुन त्यांना योग्य सोई सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात आणि यात स्वता जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष दयावे अशी मागणी जोरगेवार यांनी केली असून शालेय बसेसची नियमीत तपासणी व्हावी. वाहण चालकाचे परवाने तपासणी करूनच त्याला सेवेत रूजू करावे. वाहनचालकाची मेडिकल तपासणी व्हावीविद्यार्थ्याची चढण्याची व उतरण्याची जागा नियोजित करावी. वाहनचालकाचे फोन नंबर पालकांना द्यावेशाळा व्यवस्थापनाने शालेय परिसरात वाहणाची जागा नियोजित करावी. आपला मुगला बसमध्ये बसला व उतरला याची माहीती पाल्यांच्या फोनवर एस.एम.एस द्वारा देण्यात यावीआदि मागण्या जोरगेवार यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनातून केल्या आहे. या सर्व मागण्या लक्षात घेवून सर्व शाळांच्या व्यवस्थपनाची संयुक्त बैठक लावून त्यांना या बाबत आदेश देण्यात आले आहे अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.