भिमगीतात प्रबळ सक्षम समाज घडवीण्याची ताकत - किशोर जोरगेवार हजारो नागरिकांच्या उपस्थित पार पडला भीम गीतांचा कायर्क्रम Featured

Saturday, 02 February 2019 06:23 Written by  Published in चंद्रपूर Read 22 times

 आंबेडकरी चढवळ पुढे नेण्यात भिमगीतांचे मोठे योगदान असून भिमगीतातून मिळणा-या प्रेरणेतूनच उदयाचा समाज प्रबळ आणि सक्षम होणार असे वक्तव्य सामाजीक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी केले. संघर्ष युवा मंचच्या वतीने बाबूपेठ येथे जल्होश भिम गीतांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी बी.आर.एसपी. चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडेनगर सेवीका पुष्पा मूनअमोल गोवर्धनसतीश जामलेलता सहारे युवा समाजीक कार्यकर्ते सचिन किरमेसमाजीक कार्येकर्ते भास्कर कावळेआदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. सर्वप्रथम बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला किशोर जोरगेवार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रम स्थळी तथागत गौतम बुद्ध, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले कीशिकासंघटीत व्हा आणि संघर्ष करा असा नारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता.

त्यांच्या याच ना-याला अनूसरुन समाजाला संघटीत करुन त्यांच्यात अन्याया विरोधात संघर्ष करण्याची ज्योत प्रज्ववलीत करण्याचे काम भिमगीतांच्या माध्यमातून केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलेले कार्य त्यांच्या कार्याची महती मोठी आहे. ती भिमगीतात समावने शक्य नाही. असे असले तरी कमी शब्दात त्यांच्या चळवळीची उत्तम मांडणी या भिमगीतातून मांडल्या जात आहे. बदलल्या काळात  गाण्यांचे स्वरुपही बदलत गेले आहे. मात्र या स्पर्धेतही भिमगांनी स्वताची ओळख कायम ठेवत त्याची प्रसिध्दी विस्तारीत केली आहे. त्यामुळे या कलाकारांचेही कौतुक केले पाहिजे. या कलाकारांना समाजानेही प्रोत्साहीत करण्याची गरज असून त्यांच्या या प्रबोधनाच्या कार्यात सक्रिय सहभाग दर्शवीण्याची गरज आहे. युवकांसाठीही भिमगीत प्रेरणादाई असून भिमगीतातून प्रबोधनाचे काम आणखी गतीशील करुन डॉ. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घरी पोहचवीण्याचे मोठी जवाबदारी आजच्या युवकांवर आहे. या कार्यास माझी मदत लागल्यास मी सदैव तुमच्या पाठीशी असून या प्रबोधनाच्या कार्याला गतीशील करण्यासाठी मी कटीबध्द आहे. अशी ग्वाहीही या प्रसंगी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूमीत थोरातमयुर वाकडेसतिश थोरातरोहित कस्तूरेसुशांत टेंभूर्नेनिखील लाळेराहूल निमगडेआषिश तामगाडेसागर ठाकरे यांच्यासह संघर्ष युवा मंडळच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम केले.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.