आता वरोरा (आनंदवन) येथे पटणा-पूर्णा सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा ना. हंसराज अहीर यांनी वरोरावासीयांची मागणी केली पूर्ण Featured

Friday, 01 February 2019 06:21 Written by  Published in चंद्रपूर Read 19 times
चंद्रपूर: पटणा-पूर्णा (17609/17610) या एक्सप्रेसचा थांबा विख्यात समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याचा सुगंध जागतिक स्तरावर पोहचविणा-या आनंदवन स्थित वरोरा या शहरात मंजूर करण्यात यावा अशी मागणी वरोरावासीयांकडून सातत्याने केली जात होती. अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वरोरा वासीयांच्या या मागणीची पूर्तता करून त्यांच्या भावनांना न्याय दिला आहे. येत्या 4 फेब्रुवारी 2019 रोजी रात्राी 10.00 (22.00) वाजता वरोरा येथे ही एक्सप्रेस पहिल्यांदाच थांबणार असल्याने वरोरा वासियांमध्ये या एक्सप्रेसला घेवून जल्लोषाचे वातावरण आहे. सदर एक्सप्रेसचा थांबा देशाचे वैभव असलेल्या कुष्ठरोगी तसेच दिव्यांगांना समर्पित आनंदवन स्थित वरोरा या शहरात द्यावा यासाठी ना. अहीर यांनी विशेष भुमिका घेतल्याने केंद्रीय रेल्वे मंत्राी पियुष गोयल यांनी या भुमिकेचा आदर करीत वरोरा येथे या एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतांनाच त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिल्याने आता येत्या सोमवारी ही एक्सप्रेस वरोरा रेल्वे स्थानकावर थांबत आहे.
सदर एक्सप्रेस ही पटण्यावरून रविवारी 3 फेब्रुवारी रोजी रात्राी 23.10 वा. निघेल व सोमवारी वरोरा येथे रात्रौ 22.00 वाजता पोहचेल व हुजूर साहेब नांदेड येथे मंगळवारी सकाळी 6.10 वा. पोहचेल त्यामुळे नांदेड येथील गुरूद्वारा दर्शनासाठीसुध्दा प्रवाशांना ही गाडी सोयीस्कर ठरणार आहे. या गाडीमुळे पर्यटनासाठी उत्तर भारतातून चंद्रपूर जिल्हयात येणा-या मोठया संख्येतील प्रवाशांना तसेच चंद्रपूर येथील प्रवाशांना नांदेड तसेच प्रयागराज येथे भरलेल्या कुंभ मेळयाला तसेच दीनदयाल उपाध्याय जक्शन वरून वारानसी अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर असल्याने त्या ठिकाणी पोहचण्यासाठी ही गाडी प्रवाशांना सुविधाकारक ठरणार आहे. या गाडीचा लाभ चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणात असलेल्या उत्तर भारतीय बांधवांना होणार असल्याने सदर गाडी अत्यंत महत्वपूर्ण व प्रवाशांना न्याय देणारी ठरली आहे. 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.