रोगनिदान शिबीर समाजसेवेचे उत्तम माध्यम आमदार नानाजी शामकुळे यांच्या हस्ते रोगनिदान शिबीराचे उदघाटन Featured

Thursday, 31 January 2019 08:13 Written by  Published in चंद्रपूर Read 20 times

चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत आरोग्याच्या सोइ, सुविधा पोहचण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील प्रत्येक माणसाला आरोग्याच्या लाभ मिळण्यासाठी रोगनिदान शिबीर उत्तम माध्यम असल्याचे मत आमदार नानाजी शामकुळे यांनी व्यक्त केले. ते ओबीसी मोर्च्या प्रसिद्धी प्रमुख  संजय पटले यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ आयोजित रोगनिदान शिबीर कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. अंजलीताई घोटेकर, भाजप युवा नेता मोहन चौधरी, नगरसेवक अंकुश सावसाकडे, नगरसेविका वंदना जांभुळकर, चंद्रकलाताई सोयाम, शशी सिंग, चंदन पाल, रमाकांत यादव, अनुप यादव, मनोज जीवतोडे, गजानन राऊत, धम्मप्रकाश भम्मे, सचिन शामकुळे, आशिष ताजणे, सुभाष मलेकर, सूरज सोयाम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी रक्तगट तपासणी११७, मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी ४५, कान, नाक, घसा ४५ तपासणी येथील नागरिकांनी केली.

यावेळी वाढदिवसा निमित्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ मिळाल्यामुळे येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होता.    

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.