3 सुपरफास्ट रेल्वे गाडयांचा चंद्रपुरात थांबा 4 व 5 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हिरवी झेंडी दाखविणार Featured

Wednesday, 30 January 2019 07:09 Written by  Published in चंद्रपूर Read 22 times
चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर मुन्नारगुडी ते भगत की कोठी, गांधीधाम-विशाखापट्टनम तसेच तिरूवेनपल्ली ते बिलासपूर या सुपरफास्ट रेल्वे गाडयांचा थांबा मंजूर झाला असून गांधीधाम-विशाखापट्टनम ट्रेन नं. 18502 ही गाडी सोमवारला रात्रौ 22.45 वा. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार असून तिरूनेलवेली-बिलासपूर ट्रेन नं. 22620 ही साप्ताहीक गाडी सोमवारी दुपारी 12.02 वाजता चंद्रपूर स्थानकावर पोहचेल तसेच बिलासपूर-तिरूनेलवेली टेªेन नं. 22619 मंगळवार दि. 05 फेब्रुवारी 2019 रोजी 17.52 ला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. याबरोबरच मुन्नारगुडी ते भगत की कोठी ट्रेन नं. 16864 ही गाडी मंगळवारला दुपारी 12.02 ला चंद्रपूर स्थानकावर पोहचेल. विशाखापट्टनम-गांधीधाम ट्रेन नं. 18501 ही गाडी शुक्रवारी सकाळी 8.40 ला चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचेल तसेच भगत की कोठी  (जोधपूर) ते मुन्नारगुडी ट्रेन नं. 16863 ही गाडी शुक्रवारी सायं. 19.18 ला चंद्रपूर स्थानकावर पोहचेल.
दि. 4 फेब्रुवारी 2019 रोजी ट्रेन नं. 18502 (गांधीधाम-विशाखापट्टनम) व ट्रेन नं. 22620 (तिरूनेलवेली-बिलासपूर) चंद्रपूर स्थानकावर थांबेल तसेच दि. 05 फेब्रुवारी 2019 रोजी, ट्रेन नं. 16864 (मुन्नारगुडी ते भगत की कोठी) व ट्रेन नं. 22619 (बिलासपूर-तिरूनेलवेली) या गाडयांना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर हिरवी झेंडी दाखविणार असून या गाडयांच्या स्वागतासाठी चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी, रेल्वे प्रवाशांनी तसेच रेल्वे प्रवासी सुविधा संघटनांच्या पदाधिका-यांनी उपरोक्त गाडयांच्या निर्धारीत वेळेत उपस्थित राहून या गाडयांचे स्वागत करावे असे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी विशेष प्रयत्न केल्याने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर तब्बल तीन सुपरफास्ट साप्ताहीक गाडयांचा थांबा मंजूर झाला. आता या गाडयांपैकी गांधीधाम ते विशाखापट्टनम तसेच तिरूवेनपेल्ली ते बिलासपूर या गाडया दि. 4 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत. तसेच मुन्नरगुडी ते भगत की कोठी (जोधपूर) व बिलासपूर ते तिरूवेनपेल्ली या गाडया दि. 5 फेब्रवारी 2019 रोजी चंद्रपुर स्थानकात पहिल्यांदाच थांबणार आहेत. ना. हंसराज अहीर या गाडयांच्या थांब्यांबाबत आग्रही होते त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रयांनी त्यांच्या या मागणीची त्वरित दखल घेत या जिल्हयातील दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय बांधव तसेच व्यापारी, व्यवसायी, नोकरपेशा वर्ग तसेच जिल्हयातील मोठया संख्येतील प्रवाशांकरिता या तिन्ही गाडया अत्यंत सुविधाकारक ठरणार आहेत. विशाखापट्टनम ते गांधीधाम या गाडीमुळे गुजरातेतील गांधीधाम व गीर राष्ट्रीय अभयारण्यासाठी जाणा-या पर्यटकांना मोठी सुविधा होणार आहे. तामिळनाडू (हिल्सस्टेशन) मुन्नारगुडी येथुन सुटणा-या गाडीमुळे दक्षिण भारतीय प्रवाशांचीसुध्दा फार मोठी सोय होणार आहे. ना. हंसराज अहीर यांनी प्रवाशांच्या सुविधेकरिता या गाडया सुरू करून प्रवाशांसाठी  फार मोठी उपलब्धी असल्याची भावना व्यक्त होत आहे. 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.