जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळाडू वृत्ती हीच आवश्यक - किशोर जोरगेवार यादे राहुल चौधरी चषक यांच्या स्मृती प्रीत्यर्थ पठाणपुरा व्यायाम शाळा क्रीडा मंडळ, चंद्रपूर च्या वतीने जिल्हास्तरीय पुरुष व महीला कबड्डी सामने संपन्न. Featured

Wednesday, 30 January 2019 07:01 Written by  Published in चंद्रपूर Read 20 times

 यादे राहुल चौधरी चषक यांच्या स्मृती प्रीत्यर्थ पठाणपुरा व्यायाम शाळा क्रीडा मंडळचंद्रपूर च्या वतीने जिल्हास्तरीय पुरुष व महीला कबड्डी सामन्याचे आयोजन पठाणपुरा व्यायाम शाळेच्या भव्य पटांगणावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा नेते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी सांगीतले कीजिवनात आज खेळाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. खेळाच्या माध्यमातुन अनेकांनी आपले व देशाचे नांव उंचावले आहे. खेळातुन युवक वर्गाने आपला विकास घडवावा. कारण जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळाडू वृत्ती हीच आवश्यक आहे. तसेच जिल्हयातील व विदर्भातील खेळाडुला कोणत्याही अडचण भासत असेल तर माझ्याशी व माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी ग्वाही देत खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

तसेच विजयी गटाला किशोरभाऊ जोरगेवार यांचे हस्ते प्रथम विजेता संघ पठाणपुरा व्यायाम शाळा, चंद्रपूर यांना बक्षीस वितरण करण्यात आले. माजी महापौर वसंता देशमुख यांच्या हस्ते उपविजेता साईबाबा क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ, चंद्रपूर तर महिला गट प्रथम विजेता नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या हस्ते एफ.ई.गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर तर उपविजेता महिला गट महाकाली क्रीडा मंडळ माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, माजी नगरसेवक विजय चहारे, रवी चहारे, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी रवी चहारे, किशोर जवादे, रुपेश चहारे, अंकुश चौधरी, अतुल चहारे, कुणाल चहारे, सुधीर माजरे, विनोद अनंतवार, सुशांत गंधमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.