अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळ एकरी 5 हजार रुपयांची मदत जाहिर करा - किशोर जोरगेवार Featured

Tuesday, 29 January 2019 06:38 Written by  Published in चंद्रपूर Read 20 times
सतत दोन दिवस चंद्रपूरात झालेल्या अवकाळी  पावसामूळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकासान  झाले असून त्यांच्या संकट कोसळले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाने तात्काळ एकरी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी  सामाजीक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सतत होणा-या वातावरणातील बदलामूळे शेतक-यांना दरवर्षी संकटाला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या हंगामात भरभरुन पिक घेवून जुने कर्ज फेडण्याच्या आशेने पोशिंदा जोमाने शेतीच्या कामाला लागला. उधारवाडी करत  बि बियाने खेरेदी करुन त्याने शेती फुलवली. मात्र यंदाही नियतीने त्यांच्या स्वपनांवर पाणी फेरले आहे.
मागील दोन दिवसात चंद्रपूरात झालेल्या अवकाळी पावसाने या शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसाण झाले आहे. काही भागात सोसाटयाच्या वा-यासह गारपीठ झाल्याने शेतक-यांचे सर्वाधीक नूकसाण झाले आहे. बाजारपेठेत भाव नसल्याने अणेक शेतक-यांनी कापूस, चन्ना, गहू, घरी किंव्हा बाजारपेठत साठवून ठेवला होता. मात्र  अचाणक आलेल्या पावसाने त्यांचा शेतमाल  भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर अणेक शेतक-यांनी कापूस न वेचल्याने कापूस ओला झाला अश्या शेतक-यांचेही मोठे नूकसाण झाले आहे.  त्यामूळे अश्या परिस्थितीत प्रशासनाने शेतक-यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदतीचा हाथ देण्याची गरज असल्याचे जोरगेवार यांनी म्हटले असून एकरी पाच हजार रुपयांची तात्काळ मदत या नुकसानग्रस्त शेतक-यांना देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.