गैरआदिवासी अतिक्रमण धारकांना वेकोलिने जमीनीचा मोबदला द्यावा - खुशाल बोंडे Featured

Wednesday, 23 January 2019 06:17 Written by  Published in चंद्रपूर Read 33 times
चंद्रपूर: जिल्हयात कोळसा खाणींद्वारे शेतक-यांच्या जमीनीचे अधिग्रहण होत असून यात अतिक्रमीत शेतजमिनींचेसुध्दा अधिग्रहण होत असले तरी वेकोलि प्रबंधनाद्वारा केवळ आदिवासी प्रवर्गातील अतिक्रमण धारकांना जमिनीचा मोबदला देण्यात येत असून गैरआदिवासी अतिक्रमण धारकांना मोबदला व अन्य सुविधांपासून वंचित करण्यात येत असल्याने गैर आदिवासी अतिक्रमण धारकांवरील हा अन्याय असल्याने त्यांनाही आदिवासी अतिक्रमण धारकांसारखाच मोबदला व अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी जिल्हा दक्षता व सनियंत्राण समितीचे सदस्य, भाजपा नेते खुशाल बोंडे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
चंद्रपूर जिल्हयामध्ये कोळसा खाणीसाठी शेतजमिनीचे अधिग्रहण केले जात असून अतिक्रमण धारक शेतक-यांच्या जमीनीसुध्दा संपादीत करण्यात येत आहेत. परंतू महसुल अधिका-यांच्या अतिक्रमण विषयक दाखल्याला अनुसरून वेकोलि प्रबंधन आदिवासी अतिक्रमण धारक बांधवांना मोबदला व अन्य सुविधा वेकोलिच्या धोरणानुसार उपलब्ध करीत आहे परंतू याच परिसरात जे गैरआदिवासी (ओबीसी) अतिक्रमणधारक आहेत त्यांना मात्र मोबदला व अन्य सुविधांपासून वंचित केले जात असल्याने हा गैरआदिवासी अतिक्रमणधारकांवर फार मोठा सामाजिक व आर्थिक स्वरूपाचा अन्याय असल्याने हा भेदभाव दूर सारत गैरआदिवासी बांधवांनासुध्दा वेकोलिद्वारा जमीनीपोटी मोबदला व अन्य सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात अशी भुमिका खुशाल बोंडे यांनी स्वीकारली आहे. याकरिता त्यांनी भाजपा लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन तसेच वेकोलि प्रबंधनाकडे निवेदनाद्वारे आपली भुमिका स्पष्ट केली आहे. एकाच जिल्हयातील आदिवासी व गैरआदिवासी असा फरक करून मेाबदला देण्याचे धोरण अन्यायी असल्यामुळे यामध्ये सुधारणा करून व संबंधीत अतिक्रमण धारक गैरआदिवासींना महसुल विभागाद्वारे दाखले उपलब्ध करून त्यांनाही शेतजमिनीचा शासकीय दरानुसार मोबदला व अन्य सोयी उपलब्ध करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.  
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.