24 जानेवारी रोजी चंद्रकुमार बोस चंद्रपुरात नेताजींचा जयंती उत्सव व भव्य सत्कार सोहळîचे आयोजन Featured

Wednesday, 23 January 2019 06:12 Written by  Published in चंद्रपूर Read 32 times
चंद्रपूर: भारतीय स्वातंत्रय संग्राम सेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक देशगौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 122व्या जयंती उत्सव पर्वावर दि. 24 जानेवारी 2019 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू श्री. चंद्रकुमारजी बोस चंद्रपुरात येत असून त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये नेताजींचा जयंती उत्सव व नागरी सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा महानगर चंद्रपूर च्या वतीने दि. 24 जानेवारी रोजी सायं. 6.30 वाजता क्रिष्णानगर, मूल रोड चंद्रपूर येथील दुर्गा मंदिर पटांगणामध्ये आयोजित केलेल्या या समारंभाचे सत्कारमूर्ती म्हणून मा. श्री. चंद्रकुमारजी बोस उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर, राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्राी तथा पालकमंत्राी सुधीरभाऊ मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नानाभाऊ शामकुळे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.या कार्यक्रमास जि.प. अध्यक्ष देवराव भांेगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, दक्षता व सनियंत्राण समितीचे सदस्य खुशाल बोंडे, स्थायी समिती सभापती राहूल पावडे, भाजपा गटनेते वसंत देशमुख, नगरसेवक राजेश मून, डाॅ. संखारी, डाॅ. अमल पोतदार, तुषार सोम, डाॅ. दीपक भट्टाचार्य, बलाई चक्रवर्ती तसेच भाजपाचे नगरसेवक व अन्य मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्वश्री रमेश भुते, प्रमोद शास्त्राकार, प्रा. रवि जोगी, राजेंद्र तिवारी, संदीप आगलावे यांनी केले आहे. 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.