दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरण स्‍नेही फिरत्‍या वाहनावरील दुकान उपलब्‍ध होणार/ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थसंकल्‍पीय घोषणेची पूर्तता Featured

Wednesday, 23 January 2019 06:09 Written by  Published in चंद्रपूर Read 31 times

दिव्‍यांग व्‍यक्‍तींना स्‍वावलंबी होण्‍याच्‍या दृष्‍टीने हरीत ऊर्जेवर चालणा-या पर्यावरण स्‍नेही फिरत्‍या वाहनावरील दुकान अर्थात मोबाईल शॉप ऑन व्‍हेईकल मोफत उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत आज घेण्‍यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2018-19 चा अर्थसंकल्‍प विधीमंडळात सादर करताना केलेल्‍या घोषणेची पूर्तता झाली आहे.

दिव्‍यांग व्‍यक्‍तींना पुरेसा सोईसुविधा उपलब्‍ध करून रोजगार निर्मीतीस  चालना देण्‍याच्‍या उद्देशाने तसेच दिव्‍यांग व्‍यक्‍तींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करण्‍याच्‍या दृष्‍टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2018-19 चा अर्थसंकल्‍प सादर करताना मोबाईल शॉप ऑन व्‍हेईकल मोफत उपलब्‍ध करून देण्‍याचा संकल्‍प जाहीर केला होता. दिव्‍यांग व्‍यक्‍तींना सर्वसामान्‍य व्‍यक्‍तींप्रमाणे त्‍यांच्‍या कुटूंबासमवेत जीवन जगण्‍यास सक्षम करण्‍यासाठी या माध्‍यमातुन मोठी मदत होणार आहे.दिव्‍यांग व्‍यक्‍ती लाभार्थ्‍यांना हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरण अनुकुल फिरत्‍या वाहनावरील दुकानाचे मोबाईल शॉप ऑन व्‍हेईकल मोफत वाटप करणे व त्‍याकरिता योजनेची अंमलबजावणी करण्‍यासाठी निवडण्‍यात येणा-या संस्‍थेने वाहनाची देखभाल व दुरूस्‍ती करणे, निवड केलेल्‍या व्‍यवसायानुरूप दिव्‍यांग व्‍यक्‍तींना व्‍यवसायाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे, वाहनाची प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणी करणे तसेच वाहन विमा उतरविणे तसेच संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्राम पंचायत यांचेकडून फिरता व्‍यवसाय करण्‍याचा परवाना मिळवून देणे यासंदर्भात समन्‍वय व सनियंत्रण इत्‍यादी कार्ये या योजनेच्‍या स्‍वरूपात अंतर्भुत आहे. सदर योजना महाराष्‍ट्र राज्‍य अपंग वित्‍त व विकास महामंडळामार्फत राबविण्‍यात येणार आहे.या योजनेअंतर्गत खादयपदार्थ विक्री, किरकोळ व्‍यवसाय, स्‍वतंत्र व्‍यवसाय, वाहतुक व्‍यवसाय आदी व्‍यवसाय दिव्‍यांग बांधवांना करता येणार आहे.  

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.