जनतेच्‍या प्रश्‍नांसाठी सदैव लढणारा कट्टर शिवसैनिक गमावला – सुधीर मुनगंटीवार Featured

Monday, 21 January 2019 06:25 Written by  Published in चंद्रपूर Read 29 times

शिवसेनेचे नेते, माजी जिल्‍हा प्रमुख रमेश तिवारी यांच्‍या निधनाने जनतेच्‍या प्रश्‍नांसाठी सदैव लढणारा कट्टर शिवसैनिक आपण गमावला असल्‍याची शोक संवेदना अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

अल्‍पवयात झालेल्‍या त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे. सर्वसामान्‍य जनतेच्‍या प्रश्‍नांवर अनेक आंदोलने त्‍यांनी सातत्‍याने केली आहेत. या माध्‍यमातुन त्‍यांनी मोठा लोकसंग्रह निर्माण केला. त्‍यांच्‍या निधनामुळे एक कुशल नेतृत्‍व, उत्‍तम दिलदार मित्र आपण गमावला आहे. या दुःखातुन सावरण्‍याचे बळ परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटूंबियांना देवो असेही त्‍यांनी आपल्‍या शोक संदेशात म्‍हटले आहे.

 

 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.