चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे सोयीसुविधांविषयक प्रस्ताव लवकरच पूर्णत्वास Featured

Saturday, 12 January 2019 06:50 Written by  Published in चंद्रपूर Read 87 times
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रांतर्गत रेल्वेशी निगडीत विविध सोयी-सुवीधांच्या उपलब्धतेकरिता तसेच प्रलंबित रेल्वे मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात या क्षेत्राचे खासदार तथा केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी दि. 7 जानेवारी 2019 रोजी मध्य रेल्वेचे तसेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांची संयुक्त बैठक नागपुरातील रवि भवनात घेतली. या बैठकीत रेल्वेशी संबंधित अनेक महत्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा झाली. यावेळी रेल्वे विषयक अनेक सोयी-सुविधांबाबत मंत्राी महोदयांच्या उपस्थितीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. बैठकीस चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे अध्यक्ष रमणीकभाई चव्हाण, झोनल रेल्वे परामर्शदात्राी समितीचे सदस्य दामोदर मंत्राी, एमआयडीसी असो.चे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा, भाजपा नेते विजय राऊत, दक्षिण-मध्य रेल्वे समितीचे सदस्य राहुल सराफ प्रभृती प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी या बैठकीत महत्वपूर्ण रेल्वे विषयक अनेक महत्वपुर्ण मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत रेल्वे अधिकारयांना विचारणा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या. मंत्राी महोदयांना माहिती देतांना विभागीय रेल्वे अधिकाÚयांनी मुकूटबन रेल्वे स्टेशन येथे नंदीग्राम, ताडोबा एक्सप्रेसच्या थांब्याकरिता महाप्रबंधक, मध्य रेल्वे, मुंबई यांचेद्वारा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे सांगितले. बल्लारशाह येथे 24 कोचेसकरिता पीटलाईनचा प्रस्ताव बोर्डाला पाठविला असून 11.25 कोटी निधी याकरिता उपलब्ध केला आहे. सदर काम सन 2020 मार्च पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले. चंद्रपूर ते चांदाफोर्ट रेल्वे लाईनला जोडण्याकरिता प्रस्तावित लाईनचे काम (अंदाजे दीड कि.मी.) सन 2021 पर्यंत मार्गी लागेल अशी माहिती सुध्दा दिली. बल्लारशाह स्थानकावरून गाडी नं. 11401-02 नंदिग्राम एक्सप्रेसला 6 डब्बे जोडण्यासंदर्भातील प्रस्ताव मुंबई मुख्यालयास पाठविण्यात आला असल्याची माहिती दिली. तसेच आनंदवन एक्सप्रेस सप्ताहातून तीन दिवस चालविण्यासाठी नागपूर डीआरएम यांनी तयारी दर्शविली. काजीपेठ-पुणे ही एक्सप्रेस लवकरच सप्ताहातून तीन दिवस चालविण्यात येत असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांनी चंद्रपूर व बल्लारशाह स्टेशनवर प्रत्येकी दोन महिला शिपाई देण्याची सुचना केली असता डीआरएम यांनी या प्रस्तावाला तात्काळ अनुमती दिली. चंद्रपूर येथील मालधक्का साईटचे सिमेंटीकरणविषयक प्रस्ताव मुंबई मुख्यालयास सादर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. चंद्रपूर-बल्लारशहा रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधेकरिता रेल्वे बोर्डास प्रस्ताव सादर केलेला असून मार्च 2019 पर्यंत ही सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती अधिकारयांनी दिली. चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर रिझर्वेशन काऊन्टर्स सकाळी 8 ते सायं. 8 पर्यंत तसेच चांदाफोर्ट रिझर्वेशन काऊन्टर स. 8 ते दु. 3 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे या अधिकारयांनी सांगीतले. गाडी नं. 12851-52 चेन्नई-बिलासपूर तसेच गाडी नं. 17007-08 सिकंदराबाद-दरभंगा एक्सप्रेसचा थांबा चांदाफोर्टला देण्याचे मान्य करण्यात आले. ट्रेन नं. 22647-48 त्रिवेंद्रम-कोरबा एक्सप्रेस हावडा पर्यंत वाढविण्यासाठी डीआरएम दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे यांनी मंत्राी महोदयांना आश्वासन दिले. बरोनी-गोंदिया 15231-32 या सुपरफास्ट एक्सप्रेसचा विस्तार बल्लारशहा पर्यंत करण्याची तयारीसुध्दा अधिकाÚयांनी या बैठकीत दिली. बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम युध्दपातळीवर सुरू असून ते 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असेही या बैठकीत अधिकारयांनी स्पष्ट केले. बगडखिडकी गेट नं.42 रेल्वे लाईनवर आरओबी ला जागा होत नसल्याने  अंडरपास करिता पाठविलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून यवतमाळ जिल्हयातील पिंपळखुटी रेल्वे अंडरपास फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण केला जाईल. तसेच वणी-घुग्घूस रेल्वे उड्डणपुलाचे प्लॅन मंजूर करून मुंबई मुख्यालयास पुढील कार्यवाहीकरिता सादर करण्यात आले आहे. वणी प्लॅटफार्म विस्तारीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी असलेले कोल सायडींग लवकरच इतरत्रा स्थलांतरीत करण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारयांनी दिली. वणी-यवतमाळ या नव्या रेल्वे लाईनकरिता सव्र्हेक्षण करण्यास मध्य रेल्वे विभागीय प्रबधकांनी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांना या बैठकीत होकार दिला.  दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मंडल रेल प्रबंधकांनी चांदाफोर्ट ते गोंदीया  दरम्यानचे सर्व स्टेशनवरील प्लॅटफाॅर्म उंच करण्याचे काम लवकरच सुरू होत असल्याचे सांगीतले. तसेच या मार्गावरील आवश्यक ठिकाणचे अंडरपास देखील होत आहेत. याबरोबरच रेल्वे विषयक अन्य विषयांवरसुध्दा बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.