सहकारातून समाज व राष्ट्र उन्नती शक्य- खुशाल बोंडे Featured

Saturday, 12 January 2019 06:42 Written by  Published in चंद्रपूर Read 92 times
जिवती: ‘‘विना सहकार, नही उध्दार’’ हे सहकाराचे ब्रिद असून सहकारातूनच समाज, राष्ट्र व आर्थिक उन्नतीला हातभार लागतो या क्षेत्रात सहकार भारतीचे फार मोठे योगदान असून सहकाराचे सर्वत्रा जाळे विणल्या गेले आहे असे प्रतिपादन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक दिशा समितीचे सदस्य खुशाल बोंडे यांनी मारईपाटन या तीर्थक्षेत्राी सहकार विषयक आयोजित कार्यक्रमास संबोधित करतांना केले. या कार्यक्रमाला आदिवासी नेते वाघुजी गेडाम, जि.प. सभापती सौ. गोदावरी केंद्र, भाजपा जिवती तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, भाजपा विस्तारक सतीश दांडगे, भाजपा किसान आघाडी जिल्हा महामंत्राी राजु घरोटे, सुरेशभाऊ केंद्रे, दत्ताजी राठोड, भाऊराव चंदनखेडे, गोपीनाथ चव्हाण, महादेव तपासे, सचिन शेंडे, भारत तेलंग आदी प्रभृतींची उपस्थिती होती.
समान उद्देशाच्या प्राप्तीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून होणारा प्रयत्न म्हणजेच सहकार होय असे सांगून देवेंद्र फडणवीस सरकारने शेती, उद्योग व अन्य क्षेत्रात सामुहिक प्रयत्नांवर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात सहकाराची व्याप्ती सर्वच क्षेत्रात दिसून येत असून देशात 6 लक्ष सहकारी संस्थांशी 21 करोड लोक जुळले असल्याचे सांगत शासन सहकारास प्रोत्साहित करीत असल्याचे सुध्दा यावेळी सांगितले. सहकारातूनच ग्रामीण क्षेत्राची कृषि, उद्योग व अन्य क्षेत्रात प्रगती शक्य असून ग्रामीणांनी, युवकांनी, बरोजगारांनी सहकाराच्या माध्यमातून स्वतःची उन्नती साधावी असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी अन्य मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ग्रामस्थांची उपस्थिती होती. 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.