वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानुर या तीन बॅरेजसाठी निधी उपलब्‍ध करावा/ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍याकडे मागणी Featured

Saturday, 12 January 2019 06:35 Written by  Published in चंद्रपूर Read 75 times

चंद्रपूर जिल्‍हयातील वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानुर या तीन बॅरेज च्‍या स्‍थळी 7.50 मीटर पेक्षा जास्‍त खोलीवर कठीण भूस्‍तर उपलब्‍ध होत असल्‍यामुळे सर्वेक्षण, अन्‍वेषण, संकल्‍पन व सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल वॉप्‍कोस या संस्‍थेकडून करून घेण्‍यासाठी मान्‍यता देण्‍याचा ठराव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्‍या नियामक मंडळाच्‍या बैठकीत पारित करण्‍यात आला आहे. सदर तिन्‍ही बॅरेजेसच्‍या कामासाठी निधी उपलब्‍ध करण्‍याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या मागणीसाठी अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्‍लीत भेट घेतली व मागणीचे निवेदन सादर केले.

दिनांक 10 जानेवारी रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व वरील विषयाबाबत सविस्‍तर चर्चा केली. यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर जिल्‍हयातील सदर तीन बॅरेजेस च्‍या कामासंदर्भात सर्वेक्षण, अन्‍वेषण, संकल्‍पन व सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल वॉप्‍कोस या संस्‍थेकडून करून घेण्‍यासाठी मान्‍यता मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर च्‍या नियामक मंडळाच्‍या 71 व्‍या बैठकीत ठराव पारित करण्‍यात आला आहे. आमडी, आर्वी धानुर, धानोरा हे तिन्‍ही बॅरेजेस अतिशय महत्‍वाचे बॅरेजेस आहेत. धानोरा बॅरेजमधून चंद्रपूर शहरास पिण्‍याकरिता 25 दलघ‍मी, औद्योगिक क्षेत्राकरिता 44.56 दलघमी पाण्‍याचे नियोजन आहे. तसेच आमडी बॅरेजमधून बल्‍लारपूर, राजुरा व चंद्रपूर शहरासाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याकरिता 30 दलघमी, औद्योगिक क्षेत्राकरिता 24.17 दलघमी पाण्‍याचे नियोजन आहे. सदर बॅरेजस करिता वनजमिनीची आवश्‍यकता नाही. आमडी बॅरेजचे सिंचन क्षेत्र 2890 हेक्‍टर, आर्वी धानुर बॅरेजची सिंचन क्षेत्र 4021 हेक्‍टर तर धानोरा बॅरेजचे सिंचन क्षेत्र 4341 हेक्‍टर इतके आहे. आमडी बॅरेजची अंदाजित किंमत 217 कोटी, आर्वी धानुर बॅरेजची अंदाजित किंमत 164.50 कोटी तर धानोरा बॅरेजची अंदाजित किंमत 328.11 कोटी इतकी आहे. सदर बॅरेजसाठी आवश्‍यक निधी त्‍वरीत उपलब्‍ध करण्‍यात यावा, अशी मागणी या चर्चेदरम्‍यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सदर मागणी तपासुन याबाबत त्‍वरीत सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले. 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.