महावितरणमधील अभियंता व कर्मचा-यांच्या मागण्या पुर्ण कराव्यात - किशोर जोरगेवार, आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनाला दिला पाठींबा Featured

Monday, 07 January 2019 14:42 Written by  Published in चंद्रपूर Read 121 times

अविरत काम करुन शहरातील प्रत्येक घरात प्रकाश पोहचवीण्याचे काम करणा-या महावितरणच्या कामगारांसह अभियंत्यांवर आंदोलनाची वेळ ओढावणे हे दुर्दैव आहे. त्यांच्या मागण्या न्यायक असून त्या पुर्ण करण्यात याव्हा अशी मागणी चंद्रपूर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी पूकारलेल्या आंदोलनालाही जोरगेवार यांनी आपला पाठींबा दर्शवीला आहे. विविध मागण्यांसाठी महावितरण केंद्रात काम करणा-या कामगारांसह अभियंत्यांनी आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी आज सोमवारी 24 तासांचा संप पुकारला होता. यावेळी त्यांना मार्गदर्शन करतांना जोरगेवार बोलत होते.

 

            महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनरचना संघटनांनी सुचविलेल्या सूचनांना अंतर्भाव करून अमलात आणावे. जसे किपुनरचना करतांना रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच उपविभागामधील अधिका-यांची आणि कर्मचा-यांची संख्या कमी न करता सध्यास्थितीत असलेली पदे कायम ठेवणे,महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागी करत असतांना एकूण मंजूर पदे कमी न करता अमलात आणावेशासन व व्यवस्थापनाणे महावितरण कंपनीने राबविण्यात येत असलेले खाजगीकरण/फ्रँचाईसीवर खाजगी भांडवलदार कंपनीला देण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी.महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लागू जल विद्युत निर्मिती संचाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे. या प्रमुख मागण्यांसह  चंद्रपूर परिमंडळा अंतर्गत चंद्रपूर उपविभाग क्र. १,२ व वरोरा उपविभाग येथे जवळपास प्रत्येकी ५०,००० चे वर वीज ग्राहक असून वीज ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचे दृष्टीकोनातून तीनही उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभाग निर्माण करण्यात यावे.उपविभाग क्र. ३ अंतर्गत घुगुस वीज वितरण केंद्राचा औद्योगिक विस्तार पाहू जाता घुगुसरामनगरशास्त्रीनगरतुकूम व चंद्रपूर ग्रा. वीज वितरण केंद्राचे विभाजन करून नवीन वीज वितरण केंद्र निर्माण करण्यात यावे.,                 

                        मीटर्सच्या अपु-या पुरवठ्यामुळे सदोष मीटर्स बदलते जात नाही व नवीन विद्युत पुरवठा सुद्धा मीटर अभावी विलंबाने दिला जातो. त्यामुळे लाईन लाँसचे प्रमाण वाढते व महसूल देखील बुडतो. तसेच ग्राहकांच्या रोषाला कामगारांना तोंड ध्यावे लागते. यात तातडीने सुधारणा व्हावी. या स्थानीक मागण्यांच्यासह ईतर मागण्यांसाठी आज  महावितरणातील कर्मचारी आणि अभियंत्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. यावेळी किशोर जोरगेवार आपल्या मागन्यांनबाबत चर्चा करण्यासाठी  आंदोलकर्त्यांनी बोलावीले असता जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देवून त्यांचा आंदोलनाला पाठींबा दर्शवीला यावेळी बोलतांना जोरगेवार म्हणाले कीमहावितरण मध्ये काम करण्यारे कर्मचारी प्रामाणीकमणे काम करुन जनतेची सेवा करत आहे. महावितरणाच्या कामाचा दर्जा मागील काही वर्षांमध्ये उंचावला आहे. याचे पूर्ण श्रेय येथील अभियंताअधिका-यांसह कर्मचा-यांचे आहे. त्यामोबदल्यात त्यांना योग्य न्याय दिला गेला पाहीजे. त्यांच्या मागण्या रास्त असून शासणाने त्या तात्काळ सोडव्यात अशी मागणी त्यांनी या प्रसंगी बोलतांना केली असून त्यांच्या आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवीला आहे.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.