पोंभुर्णा येथे उभारण्‍यात येणारे अगरबत्‍ती उत्‍पादन युनिट रोजगार निर्मीतीचे प्रशस्‍त दालन ठरणार – सुधीर मुनगंटीवार/ आयटीसी, बांबु विकास मंडळ आणि बिआरटीसी यांच्‍यात सामंजस्‍य करार Featured

Monday, 07 January 2019 09:01 Written by  Published in चंद्रपूर Read 92 times

आयटीसी अगरबत्‍ती प्रकल्‍प, महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळ आणि बांबु संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पोंभुर्णा येथे उभारण्‍यात येणारे अगरबत्‍ती युनिट या परिसरात रोजगार निर्मीतीचे प्रशस्‍त दालन ठरेल व त्‍या माध्‍यमातुन परिसराच्‍या विकासात भर घातली जाईल अशी अपेक्षा अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

 दिनांक 4 जानेवारी रोजी नागपूर येथे आयटीसी अगरबत्‍ती प्रकल्‍प, महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळ आणि बांबु संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्‍यात पोंभुर्णा येथे अगरबत्‍ती उत्‍पादन युनिट उभारण्‍याच्‍या दृष्‍टीने सामंजस्‍य करार करण्‍यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख उमेश अग्रवाल, नागपूरच्‍या महापौर नंदा जिचकार, जैवविविधता मंडळाचे अध्‍यक्ष विलास बर्डेकर, महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, जैवविविधता मंडळाचे सदस्‍य तथा आयटीसी कंपनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. रवी रायवरम तसेच ऑपरेशन विभागाचे प्रमुख श्री. एम. मुर्लीधर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. पोंभुर्णा येथे उभारण्‍यात येणारे अगरबत्‍ती उत्‍पादन युनिट ची क्षमता 100 मेट्रीक टन असून चांदा ते बांदा विकास योजनेच्‍या माध्‍यमातुन हा प्रकल्‍प मंजूर झाला आहे. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन पोंभुर्णा तालुक्‍यातील 200 हून अधिक आदिवासी महिलांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होणार आहे. या प्रकल्‍पासाठी 4.85 कोटी रू. निधी मंजूर झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत या अगरबत्‍ती उत्‍पादन युनिटसाठी सामंजस्‍य करार करण्‍यात आला. आता आयटीसी च्‍या मंगलदीप ब्रँन्‍ड ची अगरबत्‍ती पोंभुर्णा येथे तयार होणार आहे.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.