झरी पर्यटन केंद्राकरीता 30 लक्ष रू. निधी मंजुर करणार- सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर तालुक्‍यातील डोणी येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण संपन्‍न Featured

Monday, 07 January 2019 06:15 Written by  Published in चंद्रपूर Read 78 times

बफर झोन क्षेत्राच्‍या विकासासाठी आम्‍ही डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अमलात आणली. त्‍यामाध्‍यमातुन या परिसरात 100 टक्‍के घरामंध्‍ये एलपीजी गॅस उपलब्‍ध करून देण्‍याची कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरात सिंचनाच्‍या सोयी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने सुध्‍दा आपण प्रयत्‍नशिल आहोत. 3 कोटी रू. निधी खर्चुन मौलझरी तलावाची विशेष दुरूस्ती करून शेतीला पाणी देण्‍याची व्‍यवस्‍था आपण केली आहे. माजी मालगुजारी तलावांच्‍या विशेष दुरूस्‍तीची कामे पुर्ण केली आहे. महिला बचत गटांना विविध व्‍यवसायांच्‍या माध्‍यमातुन रोजगार उपलब्‍ध करून देण्‍यासाठी आपण प्रयत्‍नशिल आहोत. या परिसरातील झरी पर्यटन केंद्राकरीता 30 लक्ष रू. निधी लवकरच उपलब्‍ध होईल अशी ग्‍वाही अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दि. 06 जानेवारी 2019 रोजी चंद्रपूर तालुक्‍यातील डोणी येथे सामाजिक सभागृहाच्‍या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.  यावेळी भाजपा नेते रामपाल सिंहजिल्‍हा परिषदेचे समाज कल्‍याण सभापती ब्रिजभुषण पाझारेजिल्‍हा परिषद सदस्‍य रोशनी खान,गौतम निमगडेमनपाचे स्‍थायी समिती सभापती राहुल पावडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणालेहा परिसर बफर झोन क्षेत्रात येत असल्‍यामुळे रस्‍त्‍याचे डांबरीकरण करण्‍यात आले नाही. परंतु येत्‍या काळात रस्‍त्‍याचे डांबरीकरण करण्‍यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करू. या परिसरात उत्‍तम आरोग्‍य सेवा नागरिकांना उपलब्‍ध  होईल याकडे सुध्‍दा आपण लक्ष देत आहोत. मिशन  शौर्य अंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्‍यांनी माऊंट एवरेस्‍ट शिखर सर करून देशात जिल्‍हयाचे नाव मोठे केले आहे. आदिवासी विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणासाठी शासन मदत करीत आहे. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे स्‍मारक 25 कोटी रू. खर्चुन चंद्रपूर येथे उभारण्‍यात येत आहेया परिसरातील अंतर्गत रस्‍त्‍यांच्‍या बांधकामासाठी 2515 या लेखा शिर्षाअंतर्गत 30 लक्ष रू. निधी उपलब्‍ध करण्‍याची घोषणा यावेळी केली.यावेळी डोणी येथील नागरिकांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्‍वागत केले. स्‍वागतासाठी आकर्षक पध्‍दतीने स्‍वागतद्वार उभारण्‍यात आले होते. अभिनव पध्‍दतीने बुके देत अर्थमंत्र्यांचे स्‍वागत करण्‍यात आले. गावातील महिलांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे औक्षण करत स्‍वागत केले. ढोल ताशांच्‍या गजरात, फटाक्‍यांची आतीशबाजी करत वेगळया पध्‍दतीने नागरिकांनी मान्‍यवरांचे स्‍वागत केले. या स्‍वागताबद्दल अर्थमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले. डोणी येथे 22.53 लक्ष्‍ा रू. निधी खर्चुन बांधण्‍यात आलेल्‍या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी 92 कुटुंबांना ब्‍लँकेटचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.  ि‍जल्‍हयाच्‍या विकासाबाबत काळजी करण्‍याचे कोणतेही कारण नसल्‍याचे ते यावेळी बोलतांना म्‍हणाले. सीएम चषक स्‍पर्धांमधील विजेत्‍यांना  यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषिकांचे वितरण करण्‍यात आले. यावेळी नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.