देशाच्या प्रगतीत महिलांचे मोठे योगदान - किशोर जोरगेवार सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम , महिला मंडळच्या वतीने जोरगेवारांचा सत्कार Featured

Friday, 04 January 2019 09:16 Written by  Published in चंद्रपूर Read 103 times
देशाचा विकासात महिलांसाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सामाजीक क्षेत्रात काम करत असतांना महिला सशक्षमीकरण हा माझा ध्येय राहीला आहे.या दिशेने आम्ही काम करत असून महिलांना रोजगार देण्यासह विविध क्षेत्रात त्यांना शक्य ती मदत करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहला आहे. आज सावित्रीबाई फुले जंयती निमीत्य महिलांच्या वतीने माझा सत्कार होणे, ही माझ्या कामांची मोठी पावती असल्याचे मि समाजतो हा सत्कार मला समाजात काम करण्याची नवी ताकत देणारा असून माझी जवाबदारी वाढवीणारा आहे. या जवाबदारीचा मी स्विकार करुन कोणत्याही क्षेत्रात काम करत असलेल्या महिलांना कुठलीही अडचण आल्यास भाऊ  म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल अशी ग्राव्ही किशोर जोरगेवार यांनी दिली.
सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमीत्य जय बजरंगबली शारदा महिला मंडळच्या वतीने बाबुपेठ येथील सम्राट अशोक चौकातील जय बजरंगबली मंदिर पटांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  जंयती तथा किशोर जोरगेवार यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बचतगट संयोजक, पांडुरंग खडसे, सामाजीक कार्यकर्ते दिनेश पाझारे, करंदे, वंदना हातगावकर, संतोषी चैव्हाण, विनोद गोलजवार आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.आजवर पुरुषांचा ताबा असलेल्या अणेक क्षेत्रात आता महिलांनी यशस्वी ताबा मिळवीला आहे. याचच उत्तम उदाहरण आपल्या बाबुपेठ परिसरात आहे. आजवर गेटमॅनच्या कामावर पुरुषांचाच ताबा होता. मात्र बाबुपेठचा रेल्वे गेट पाडन्याचे  आणी उघडण्याचे काम एक महीला भगीने सांभाळत आहे. वेंकोलीमध्ये ब्राटिंगचे  काम असो, की आटो चालवीण्याचे काम असो महिला सक्षमपणे पार पाडत आहे.  आजच्या महिला पुरुषांचा बरोबरीनेच नव्हे तर त्यांनी अणेक क्षेत्रात पुरुषांनाही मागे सोडले आहें. अशे अणेक उदाहरणे समाजात आहे. ते सांगायचे झाले तर असे शेकडो आयोजनही कमी पडेल. आजचे चित्र पहाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पेरलेले महिला शिक्षणाचे बिज आता वटवृक्षात रुपात्तरीत झाले आहे. असे असले तरी महिलांवरील अत्याचारावर पुर्णताह आळा बसलेला नाही. मात्र आजची सुशिक्षीत महिला अत्याचारा विरोधात आवाज बुलंद करु लागली आहे. हे ही नाकारता येवू शकत नाही. ही ताकत  या महिलांना शिक्षणाने दिली असुन या भागातील एकही महिला शिक्षणापासुन वंचीत राहता कामा नये असे आवाहण यावेळी बोलतांना जोरगेवार यांनी केले. या प्रसंगी किशोर जोरगेवार यांनी महिलांसाठी केलेल्या विविध कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मंडळाच्या अध्यक्षा अनुसया कंरदे, सचिव, गीता चवारे,  तारा वाधधरे, शेवंता चिंचोलकर, राधा झोडे, ललीता चोखारे, शशीकला गानफोडे, सिंधू राखडे, कमल कोल्हे, दिपक पदमगीरवार, विनोद अनंतावार, इरफान शेख, यांच्या सह परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन कल्पना शिंदे  यांनी केले तर आभार गीताने आभार प्रदर्शन करण्यात आले.
Last modified on Friday, 04 January 2019 09:26
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.