अभिनव संकल्पनेअंतर्गत मनपा शालेय विद्यार्थ्यांसाठी "आजी - आजोबा संवाद" उपक्रम Featured

Wednesday, 02 January 2019 10:23 Written by  Published in चंद्रपूर Read 71 times

चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे माआयुक्त श्रीसंजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी "आजी - आजोबा संवादया अभिनव उपक्रमाची सुरवात करण्यात आलीचंद्रपूर बचाव संघर्षसमिती  जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे उदघाटन नववर्षाच्या पहिल्या दिनी सावित्रीबाई फुले शाळामनपा चंद्रपूर येथे करण्यात आलेकार्यक्रमाचे उदघाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

 

   आजीच्या कुशीत बसून आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यात फार मजा यायची असे आपले आईबाबा आपणास सांगतातवर्तमान काळात मात्र आपण या सुखापासून दुरावत चाललो आहोतज्येष्ठ नागरिक हे समाजातील अडगळ नाहीत तरसमाजाचा आधार आहेतमात्र आजच्या घडीला आजी आजोबांचे महत्व घरातून हद्दपार होत असल्याने भावी पिढीला योग ते संस्कार देणे दुर्मिळ होत आहेघरातच आजी-आजोबा असतीलतर त्यांचं  बाळाबरोबरचं नातं नैसर्गिकपणेच उमलतजातंआई-बाबा कामावर गेल्यावर त्यांच्याच देखभालीखाली बाळ वाढत असतंपालकांच्या अनुपस्थितीत ते पालकत्व निभावतात म्हणूनच "आजी - आजोबा संवाद"  या अभिनव उपक्रमांतर्गत 'जुने ते सोनेया म्हणीप्रमाणे बालपणीआजीआजोबांच्या तोंडून ऐकलेल्या गोष्टी ऐकणे हे मानसिक संगोपनासाठी किती गरजेचे याबाबत मार्गदर्शन उपस्थितांद्वारे याप्रसंगी करण्यात आले.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉगोपाळ मुंधडाउदघाटक श्रीगजानन बोकडे उपायुक्तमनपाप्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ नागरिक संघाचे श्री विजयराव चंदावर,अश्विनी खोब्रागडेश्रीमल्लिक शाकीरदिनेश जुमडेरश्मी वैरागडेप्राचार्यदिवाकर पुद्दटवारडॉप्रीती कांबळेविलास माधानकरलक्ष्मणराव सूरअजय आदमने यांची उपस्थिती होतीकार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश नीत प्रशासन अधिकारी शिक्षण मनपा चंद्रपुर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी कु.वैष्णवीसिडाम हिने केले कार्यक्रम यशस्वीयासाठी सौ.अंडेलकर , सौ.कुराणकरसौ.कुकूडपवारश्री अरूण वलके  , शिवलाल ईरपाते  , भास्कर गेडाम यांनी सहकार्य केले      

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.