आठ दिवसात खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करा Featured

Wednesday, 02 January 2019 09:12 Written by  Published in चंद्रपूर Read 77 times

 विकास कामांना आमचा विरोध नाही परंतु विकास कामाच्या नावावर जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्या जात असले तर आम्ही गप्प बसणार नाही.असा ईशारा देत आठ दिवसाच्या आत खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करा अन्यथा कंत्राटदराच्या जेसिब्या फोडुन त्याला चंद्रपुरात फिरकु देणार नाही असा तिव्र ईशारा चंद्रपूर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.

असे निवेदणही त्यांनी मनपा आयुक्तांना दिले असून येत्या आठ दिवसात हे सर्व रस्ते व्यवस्थीत करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.शहरात अमृत कलश योजनेचे काम सुरु आहे त्यासाठी २३५ कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे इतक्या मोठ्या कामाचे कंत्राट अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कंत्राटदारा विरोधात अनेक तक्रारी असून सुद्धा त्याच्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट त्याची पाठराखण करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाचा ठेकेदाराला आशीर्वाद आहे कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराला कोणत्याही कामाचा अनुभव नसल्याने अमृत कलश योजनेत शहराचे विद्रुपीकरण झाले असून शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहे. याचा नाहक त्रास चंद्रपुरकारांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अगोदर खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करा नंतर अमृत कलश योजनेतील पाईपलाइनसाठी पुढील खोदकाम करा या मागणी करीता आज चंद्रपूर महानगर पालिकेसमोर चंद्रपूर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

Last modified on Wednesday, 02 January 2019 09:18
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.