घुग्घूस येथील वेकोलिच्या राजीव रतनचे हाॅस्पीटलचे केंद्रीय हाॅस्पीटल मध्ये रूपांतर Featured

Wednesday, 02 January 2019 08:45 Written by  Published in चंद्रपूर Read 66 times

चंद्रपूर: घुग्घूस येथील वेकोलिच्या राजीव रतन हाॅस्पीटलचे  केंद्रीय हाॅस्पीटलमध्ये उन्नयनीकरणाचा (अपग्रेडेशन) शिलान्यास कार्यक्रम दि. 31 डिसेंबर, 2018 रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे शुभहस्ते पार पडला. या क्षेत्राीय रूग्णालयाच्या अपग्रेडेशन करीता ना. अहीर यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आता हे रूग्णालय केंद्रीय रूग्णालयात परावर्तीत होत आहे. या रूग्णालयाच्या उन्नयीनीकरणानंतर विविध आधुनिक सोयी आणि सुविधांनी हे रूग्णालय सज्ज होणार असल्याची माहिती याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमास चंद्रपूर जि.प.चे अध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक आर.आर. मिश्रा, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, कार्मीक निदेशक डाॅ. संजीवकुमार, जि.प. सभापती ब्रिजभुषन पाझारे, भाजपा नेते विजय राऊत, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, भाजपा जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, जि.प. सदस्या नितुताई चैधरी, घुग्घूसचे सरपंच मनिष वाढई, मनोज डंबारे, प्रकाश खुटेमाटे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ना. अहीर यांनी या उन्नयीनीकरण होणा-या नवनिर्मीत केंद्रीय रूग्णालयाचा लाभ चंद्रपूर, यवतमाळ जिल्हîतील वेकोलि अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटूंबीयांना होईल असे सांगीतले. त्यामुळे नागपूर किंवा अन्यत्रा गंभिर असणा-या कर्मचा-यांवर याच रूग्णालयात वेळीच उपचार होणार असल्यामुळे हे रूग्णालय वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी आप्रसंगी व्यक्त केला. वेकालि अध्यक्ष प्रंबंध निदेशकांनीही आपल्या समयोचित भाषणातून या रूग्णालयाच्या अपगे्रडेशनमुळे होणा-या सोयी सुविधांचा परामर्ष घेतला. सद्यस्थितीत 50 खाटांचे हे रूग्णालय असुन अपगे्रडेशन नंतर या रूग्णालयातील खाटांची संख्या 110 होणार असुन या सुविधांसोबतच अतिदक्षता विभाग, नवजात गर्भधारणा अतिदक्षात विभाग, पुनःप्राप्ती कक्ष (रिक्वरी रूम) सारख्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. याबरोबर अन्य सुविधांचाही समावेश होणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याने हे रूग्णालय या जिल्हîतील वेकोलि कर्मचारी व कुटूंबीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे.  

 
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.