पप्पू देशमूख यांचा बच्चु कडु यांच्या पक्षाला रामराम, प्रहार जनशक्ती पक्षाचा दिला राजीणामा. Featured

Tuesday, 13 November 2018 09:41 Written by  Published in चंद्रपूर Read 150 times

  विविध आंदोलन करुन त्यात यश मिळवत प्रहार संघटणेचा जिल्ह्यात विस्तार करणा-या पप्पू देशमूख यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीणामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षात असामाजीक तत्वांचा प्रवेश होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या करणाने मी राजीणामा देत असल्याचे त्यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. तसेच संपुर्ण जिल्ह्याची टिम माझ्या सोबत असल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला.

                                          मागील १२ वर्षापासून पप्पू देशमुख प्रहार संघटणेशी जुळलें होते. तर आठ वर्षापासून त्यांनी या संघटणेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारली. तेव्हा पासून त्यांनी संघटणा संपुर्ण जिल्ह्यात विस्तारीत केली. दोन वर्षापूर्वी या संघटणेचे रुपांतर प्रहार जनशक्ती पक्षात झाले. मात्र या पक्षात असामाजीक तत्व प्रवेश करत असल्याचा आरोप पप्पू देशमूख यांनी केला आहे. तसेच पक्षाच्या पदाधिका-यांची नेमणूक करतांना तथा कार्यक्रमांचे आयोजन करतांना विश्वासात घेतल्या जात नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. त्यामूळे पक्षाची बदणामी होत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. पप्पु देशमूख यांनी आपल्या कार्यकाळात अणेक मोठे आंदोलन करुन त्यात यश मिळवीले आहे. योग्य वेळी योग्य मुदा घेऊन तो तळास नेणार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. मात्र आता त्यांच्या राजीणाम्या नंतर प्रहार जनशक्ती पक्षापूढे मोठे आवाहण निर्माण झाले आहे. यापूढे पप्पू देशमूख यांची भुमीका काय असेल त्याकडे ही लक्ष राहणार आहे.                                                                                                      

                                                

Last modified on Tuesday, 13 November 2018 09:59
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.