चंद्रपूर - आजी आणि पाच वर्षीय नातीनची गळा दाबुन हत्या, Featured

Wednesday, 24 October 2018 07:44 Written by  Published in चंद्रपूर Read 150 times

आजी आणि तीच्या पाच वर्षीय नातीनची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज चंद्रपूरातील बालाजी वार्डात घडली. या घटणेमूळे शहरात खळबळ उडाली असूल शहर पोलिस या घटणेचा तपास करीत आहे. या प्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेण्यात आली असल्याचीही माहीती आहे. असे असले तरी या हत्याकांडामागचे कारण अदयापतरी स्पष्ट झालेल नाही. सूशिला कैलाश पिंपळकर वय 52 वर्षे असे मृत आजीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती अधिक माहिती नूसार आजी आणि तीची लहान मुलगी बालाजी वार्डात वास्तव्यास होती. दरम्यान एक महीण्याकरीता तीची मोठी मुलगी आणि नातीन आजीकडे राहयला आली होती. मात्र तीची मोठी मुलगी आपल्या पाच वर्षाच्या मुलीला आजीकडे ठेवून बाहेर गावी गेली होती. ती आज सकाळला चंद्रपुरात परतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटणेची माहिती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला आहे. या प्रकरणी एका संशयीताला चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले असल्याचीही माहीती सुत्रांनी दिली आहे. 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.