सार्वजनिक उत्सवातून समाजाजिक बांधिलकी निर्माण करणे गरजेचे - किशोर जोरगेवार Featured

Monday, 22 October 2018 14:07 Written by  Published in चंद्रपूर Read 128 times

 गणेश चतुर्थी पासुन शहरात सार्वजनिक उत्सवांची धुम सुरु आहे. अश्या सार्वजनिक उत्सवात विविध सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करुन समाजात सामजिक बांधिलकी  निमार्ण करण्याची गरज असल्याचे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. आंनदनगर महिला मंडळाच्या वतीने नवरात्रीउत्सवा निमीत्य विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा काल रविवारी थाठात पार पडला. यावेळ ते बोलत होते. या कार्यक्रमाला आंनदनगर महिला मंडळच्या अध्यक्षा जयश्री शहायांची अध्यक्षस्थानी तर संतोश खांडरेतहसिलदार चंद्रपूरराजू हनमंतेअध्यक्षआनंदनगर बहुउद्देशिय मंडळविजय चंदावारअध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघकेशवराव जेनेकरसचिव ज्येष्ठ नागरिक संघ,  भारती दुढानीमहिला जिल्हा प्रमूखशिवसेना आदिं मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

 

                                                      

  यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की भारत देश हा सर्वधर्मीय असून विविधतेत एकता हे या देशाचे गौरव आहे. त्यामुळे सार्वजनिक उत्सवातून प्रबोधनाचे काम करून समाजात सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याची मोठी जबादारी या समाजावर आहे. आंनदनगर महिला मंळडाच्या वतीने या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यांचे हे कार्य स्वागर्ताह असून यापूढे ही या मंडळाने असे आयोजन करुन सामाजीक एकोपा निर्माण करावा असे आवाहण यावेळी जोरगेवार यांनी केले. सध्या शहरात जिवघेण्या ड्रक्स ने थैमाण घातला आहे. या नशेच्या आहारी आजचा युवा आपले आयुष्य खराब करत आहे. या विरोधातही या मंडळाने एकत्रीत येत लढा उभारावा तसेच समाजकार्यात नेहमी अग्रसर राहावे असेही यावेळी जोरगेवार म्हणाले. या प्रसंगी मंडळाच्या वतीने आयोजीत विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हर्स्ते बक्षिस वितरीत करण्यात आले. तसेच 10 वी आणि 12 विच्या परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आंनदनगर महिला मंडळातील पदाधिकारीसदस्यांसह स्थानीक नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.  

 

 
Last modified on Monday, 22 October 2018 14:21
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.