पाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने Featured

Saturday, 29 September 2018 10:35 Written by  Published in चंद्रपूर Read 166 times

पाणी प्रश्नावरुन किशोर जोरगेवार यांनी काल केलेल्या आंदोलना नंतर आज कॉग्रेसही आग्रमक झाली असून आज आयोजीत मनपाच्या सर्व साधारन सभेत मनपा नगर सेवकांनी चांगलाच गधारोड केला. यावेळी रिकामी मडकी घेऊन महापौर पाणी दया अश्या घोषणा करत सभागृहातच मडकी फोडली. त्यामूळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता. मनपा बाहेर ही क्रॉंग्रेसच्या नगरसेवकांनी डपरे वाजवत मनपाचा जोरदार निषेध केला.

चंद्रपूर शहरात सध्या पाण्यासाठी पाणीपथ सुरु आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असला तरी शहरात पाणी कपात केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहे. या विरोधात काल किशोर जोरगेवार यांनी महापालीकेवर मोर्चा काढला होता. यावेळी ०१ ऑक्टोबर पासून नियमीत पाणी पूरवठा सुरु करु असे आश्वासन मनपा आयुक्तांकडून देण्यात आले होते. त्यानंतर आज या विषयाला घेऊन कॉंग्रेसचे नगर सेवकही आक्रमक झाले असून आयोजीत मनपाच्या सर्वसाधारन सभेत कॉंग्रेस नगरसेवकांनी चांगला गोंधड घातला यावेळी रिकामे मडके ही मनपा सभागृहात फोडण्यात आले. भाजपच्या काही नगरसेवकांनी याला विरोध केल्याने सभागृहात शाब्दीक वाद ही झाला त्यामूळे मनपा सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन ऑक्टोंबर पासून नियमीत पाणी पुरवठा केला जाईल असे महापौर यांनी जाहिर केले. इरई धरणात पाणी साठा असतांनाही केवळ कंत्राटदाराला आर्थीक लाभ पोहचवीण्यासठी शहर वासीयांवर पाणी कपातीचे संकट लादल्या जात असल्याचा आरोप शहर कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर यांनी चांदा मिररशी बोलतांना केला.

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.