मनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा Featured

Friday, 28 September 2018 13:02 Written by  Published in चंद्रपूर Read 180 times

शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले असून संपुर्ण शहरवासीयांची पाण्यासाठी चांगलीच पायपीठ सुरु आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असतांनाही फक्त कंत्राटदाराला फायदा पोहचवीण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट चंद्रपूरकरांवर लादत आहे. हा नागरिकांवर अन्याय असून हा अन्याय सहन करणार नाही असा ईशारा देत आज किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांचा मोर्चा महानगर पालिकेवर धडकला. यावेळी मनपा आयुक्तांना पाणी पुरवठा तात्काळ नियमीत सुरु करण्यात यावा या मागणीचे निवेदण देण्यात आले. आयुक्तांनीही आंदोलनाची दखल घेत 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले आहे. मात्र 1 तारखेपासून पाणी पूरवठा नियमीत न झाल्यास महानगर पालीका जलयम करुन अधिका-यांना खुर्च्यांवर बसू देणार नाही असा ईशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.

 उन्हाळ्यापासून सुरु असलेले पाणी संकट मनपाच्या बेजबाबदार पणामूळे पावसाळ्या अखेरही कायमच आहे. पावसाळयात ब-या प्रमाणात पाऊस झाल्याने इरई धरणातही मुबलक पाणीसाठी साठला आहे. असे असतांनाही शहरात भिषण पाणी टंचाई सुरु असल्याचे चित्र तयार करण्यात येत असून संपुर्ण शहरात एक ते दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे भयंकर हाल सुरु आहे. असे असतांनाही चंद्रपूकर शांत आहे. हा त्याच्या संयतेचा भाग आहे. मात्र आता मनपा प्रशासन ताडयावर न आन्यास चंद्रपूकरांचा संयमतेचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. अशी चेतावनी किशोर जोरगेवार यांनी दिली. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा तात्काळ नियमीत करा या मागणी करीता आज त्यांच्या नेतृत्वात महानगर पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. जैन भवन जवळून निघालेला हा मोर्चा हातात शासनविरोधी फलके घेऊन महापालीकेवर धडकला यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा करुन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनपा आयुक्तांनी आंदोलनाची दखल घेत एक ऑक्टोबर पासून शहरातील पाणी पूरवठा नियमीत करु असे आश्वासन दिले. मात्र तारखेपासून पाणी पूरवठा नियमीत करण्यात न आल्यास संपुर्ण चंद्रपूर महानगर पालिका जलमय करु असा ईशारा जोरगेवार यांनी दिला आहे. या आंदोलनात विनोद अनंतवार, रुपेश पांडे, सुनील पाटील, इरफान शेख, प्रकाश चंदनखेडे, राशीद हुसैन, अब्बासभाई, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, दुर्गाताई हातगावकर, राजेश मांगुळकर, सुधीर माजरे, दिपक पद्मगीरिवार, पंकज चिमुरकर,इमरान खान, प्रणीत वडपल्लीवार, मुन्ना जोगी, टिकाराम गावंडे, पुष्पा प्रसाद, पंकज दीक्षित, विलास सोमलवार आदिंची उपस्थित होती.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.