शस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण Featured

Thursday, 27 September 2018 12:45 Written by  Published in चंद्रपूर Read 124 times

 आज भर दुपारी सहा ते सात शस्त्रधारी युवकांनी शस्त्राच्या धाकाने एकोरी वार्डातील दुकाने बंद करत जवळपास अर्धा तास धुमाकूळ घातला विशेष म्हणजे घुटकाळा पोलिस चौकी समोर हा प्रकार सुरु होता. तसेच या युवकांनी  शाळेतील विदयार्थी घेऊन येत असलेल्या एका आटोचीही तोडफोड केल्याची माहीती आहे. अदयाप या प्रकरणी कोणीही तक्रार केली नसली तरी पोलिसांनी या युवकांचा शोध घेणे सूरु केला आहे. तर दोघांणा ताब्यात घेण्यात आल्याचीही माहीती आहे. 

 

                                                                                                                                  मिळालेल्या अधिक माहीतीच्या आधारे आज दूपारी चार वाजताच्या सूमारास सहा ते सात युवकांनी हातात  कु-हाडी व चाकू घेऊन एकोरी वार्डात प्रवेश केला. त्या नंतर या युवकांनी शस्त्राच्या धाकाने येथील दुकाने बंद केली. विशेष म्हणजे या यूवकांनी घुटकाळा पोलिस चौकी समोरही चांगलाच गोंधळ घातल चौकी समोरील दुकाने बंद केली. तसेच या मार्गाने विदयार्थ्यांना घेउन  येत असलेल्या आटोचीही कु-हाडीने तोडफोड केली. व फरार झाले. या बाबत अध्याप कोनीही तक्रार दाखल केली नसली तरी शहर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दोन यूवकांना ताब्यात घेण्यात आल्याचीही माहीती सुत्रांनी दिली आहे. याबाबत  विचारणा करण्यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या दुरध्वनीवर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.