ए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे, Featured

Monday, 24 September 2018 11:30 Written by  Published in चंद्रपूर Read 241 times

उपक्षेत्रीय प्रबंधक पैनगंगा मधील डब्लु सि एल कामगारांवर होणार्या अन्यायायाविरोधात त्यांच्या प्रमुख मांगण्याना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांनी सबंधीत विभागातील अधिका-यांना निवेदन दिले.

या निवेदनात ए.एम.डी.सी च्या कामगारांना पेमेंट स्लीप देण्यात यावी, ए.एम.डी.सी. च्या फेस आणि मेन्टनेंन्स विभागाच्या कामगारांना वेतन दिले जावे, आगष्ट महीण्याच्या  भारत सरकार द्वारा जाहीर केलेल्या गँजेट नोटीफिकेशन च्या आधारे प्रती कामगार यांना 24000/- वेतन देण्यात यावे, मिनीमम वेजेस अँक्ट नुसार वेतन दिले जावे, सर्व कामगारांना बोनस देण्यात यावे,.वर्षभरात 9 पगारी रजा वेजेस नुसार देण्यात यावे तसेच साप्ताहीक रजा निश्चीत करण्यात याव्या. या मागण्यांसह ईतर मागयांचा समावेश आहे.  मांगण्या तात्काळ मान्य न झाल्यास  बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी द्वारा तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी राजु झोडे यांनी दिला, यावेळी रूपेश चेनूरवार, अमित कूंभारे, अनिश सिद्दिकी, अजय पूग्गापेड्डीवार, मंगेश चिटलावार, सूरज मोरपाका, झॉकिर खान, गूरु कामटे, आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.  

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.