मोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार Featured

Friday, 21 September 2018 13:17 Written by  Published in चंद्रपूर Read 270 times

कुरबानी शांती आणि एकतेचा संदेश देणारा मोहरम चंद्रपूरात हिंदु - मुस्लिम बांधव मोठया एकोप्याने दर वर्षी मनवतात हेच या सनाचे वैशिष्ट्य असून यानिमीत्य चंद्रपूरात बाहेरुन येणा-या भक्तांच्या सेवेसाठी अणेक ठिकाणी शरबत वितरणासह विविध आयोजन करण्यात आले आहे हिंदू - मुस्लिम बांधवांनी संयूक्तरित्या केलेल्या याच  आयोजनांमुळे भक्तांच्या उत्साहात भर घालण्याचे काम केले असून असे आयोजनच हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक असल्याचे वक्तव्य किशोर जोरगेवार यांनी केले.

 

 

                 मोहरमचे औचित्य साधत आटो चालक मालक संघटनेच्या वतीने बस स्थानकाजवळ शरबत वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आटो चालक मालक संघटणेचे अध्यक्ष मुजीब शेख, उपाध्यक्ष मुज्जफर खान, सचिव जिब्राईल शेखकोशाध्यक्ष रियाज शेख, इरफान शेख, विनोद अनंतवार आदि मान्यवरांची या प्रसंगी मंचावर उपस्थिती होती जोरगेवारांच्या हस्ते फित कापून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शेकडो नागरिकांनी शरबत वितरण कार्यक्रमाचा लाभ घेतला. या प्रसंगी राषेद हुसेन, इमरान रषीद खान, अशफाख खान, अब्बास भाई, राजिक खान, सईद मिर्झा, इरशाद भाई, इम्रान भाई, विनोद अनंतावार, बबलू मेश्राम, रवी करमरकर, प्रवीण पिंपळशेंडेयांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

 

          मोहरम निमीत्य जिल्हा कारागृह परिसरात किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शरबत वाटप

             चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली दर्गावर दर्शनासाठी येणा-या भक्तांसाठी किशोर जोरगेवार यांच्या वतीने शरबत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर जोरगेवार आणि अनवर शेख यांनी प्रामूखतेने उपस्थित राहून शरबत वाटप केले.

             हजरत हुसेन रजी हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामूळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरच्या नवमी आणि दहावीला या दोन दिवसा करीता चंद्रपूरातील कारागृहात असलेला हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो यंदाही या दिवषी कारगृहातील दार खुले करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांची सेवा म्हणून येथे पोहचलेल्या हजारो भाविकांना किशोर जोरगेवार यांच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले.  

Last modified on Friday, 21 September 2018 13:27
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.