पप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ.. Featured

Wednesday, 19 September 2018 11:37 Written by  Published in चंद्रपूर

प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन सध्या चंद्रपूरातील राजीकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आमदार साहेब या मथळयाखाली टाकलेल्या या पोस्टमध्ये आमदार साहेब तुम्ही तुमच्या डॉ. जावयाला आवरा असा उल्लेख करण्यात आला आहे. विषेश म्हणजे यात आमदार किंव्हा डॉक्टरच्या नावाला उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सारेच आप-आपला अंदाज बांधत आहे.

                                                       शासकीस वैदयकीय महाविद्यालय हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत राहत असते. आता येथील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांमुळे हे महाविद्यालय पून्हा चर्चेत आले आहे. येथील कामगारांच्या समस्यांसाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगर सेवक पप्पू देशमूख समोर आले आहे. त्यांच्या अणेक समस्याही पप्पू देशमूख यांनी आपल्या आंदोलनातून सोडवीण्यात यश मिळवीले आहे. मात्र आता येथील कामगारांना येथे कार्यरत डॉक्टराकडून त्रास देणे सुरु असल्याचा आरोप पप्पु देशमुख यांनी केला आहे. ही बाब त्यांनी अणेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही लक्षात आणून दिली आहे. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी आता चक्क फेसबुकची मदत घेत आमदार साहेब तुम्ही तुमच्या डॉक्टर जावयाला आवरा अन्यथा जनतेत जाऊन आम्हला हे सांगावे लागेल असा दमच भरला आहे. त्यामुळे सध्या या पोस्टची चर्चा सर्वत्र सुरु असून तर्क - विर्तकांना ओघ आला आहे.

Last modified on Friday, 21 September 2018 13:29
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.