मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन Featured

Tuesday, 18 September 2018 12:54 Written by  Published in चंद्रपूर

चंद्रपूर: 1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी नांदेड, हैद्राबाद सह चंद्रपूर जिल्हîतील राजुरा, कोरपना व जिवती तालुके हे निजाम साम्राज्याचे भाग होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर, 1948 रोजी हा भाग स्वतंत्र झाला. या लढ्याला बराच मोठा इतिहास साक्षीदार असुन तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून ’आॅपरेशन पोलो’ राबवुन राजुरा तालुक्यातील निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य पत्कारावे लागले. हे बलीदान कायम लक्षात ठेवुन देशाच्या विकासात सर्वसामान्याने सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

जिवती व कोरपना येथे आयोजीत राजुरा मुक्तीसंग्राम दिन ध्वजारोहन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. राजुरा उपविभागतील राजुरा, कोरपना व जिवती येथे ’राजुरा मुक्तीसंग्राम दिन’ मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यानिमीत्त जिवती येथे बस स्थानक चैकात तर कोरपना येथे मुख्य चैकात ध्वजारोहन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही तालुक्यात ना. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. प्रसंगी भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख तथा लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा सचिव अरून मस्की, जि.प. सभापती गोदावरी केंद्र, जि.प. सदस्या कमलाबाई राठोड, किसान आघाडी जिल्हा राजु घरोटे, जिवतीचे पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, नगराध्यक्षा पुष्पा नैताम, सुरेश केंद्रे, कोरपनाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, मध्यवर्ती बॅंकेचे संचालक विजय बावणे, पं.स. सदस्य नुतन जिवने, संगायोचे अध्यक्ष संजय मुसळे, नगरसेवक सतीश उपलेंचवार, रमेश मालेकर, कवडु जरिले, सचिन डोहे यांसह प्रमुख पदाधिकायांची प्रामुख्याने उपस्थिती होती.हा देश शेतक-यांचा असुन सरकार कडुन शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक घराला शुध्द पाणी, गॅस, घर देण्याचा सरकारचा मानस असुन त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न शासन करित आहे. जिवती तालुक्यातील वन पट्ट्याच्या प्रकरणात शासन सकारात्मक कार्य करित आहे. आणि हे वन पट्टे मिळवुन देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नरत असल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगीतले. केंद्र सरकार कडुन ’स्वच्छता ही सेवा’ अभियान 15 सप्टेंबर ते 02 आॅक्टोंबर पर्यंत राबविले जात आहे. यात सर्वानी सहभाग नोंदवुन आपला गांव, आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ना. हंसराज अहीर यांनी याप्रसंगी केले.’नागरी महाराष्ट्र हागणदारी मुक्त’ संकल्पपुर्तीमध्ये जिवती नगरपंचायतीच्या योगदानाबद्दल महामहिम राष्ट्रपती कडुन सन्मान करण्यात आला. या अभियानात चांगले कार्य केल्याबद्दल जिवती नगर पंचायतच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांसह मुख्याधिकारी डाॅ. विशाखा शेरकी यांचा ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या समारोहासाठी जिवतीचे राजेश राठोड, दत्ता राठोड, येमले तर कोरपनाचे पुरूषोत्तम भोंगळे, अरूण मडावी, राकेश राठोड, जुबेर भाई, रामभाऊ होरे आदींची उपस्थिती होती.  

Last modified on Thursday, 20 September 2018 10:31
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.