सोशल मिडीयावर चालला मुनगंटीवारांचा राज, शहरातील होर्डींगही हाऊसफुल Featured

Monday, 30 July 2018 13:27 Written by  Published in चंद्रपूर Read 165 times

रुपेश कोकावार - विकास कामांना गती देत विकास पूरुष अशी स्वताची ओळख तयार करणा-या ना. सुधिर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमीत्य आज शुभेच्छा संदेशाने सोशल मिडीया हाऊसफुल झाल्याचे चित्र होते. एकंदरीतच आज दिवसभर सोशल नेटवर्किंग साईटवर सुधिर मुनगंटीवारांचाच राज दिसून आला.

मनमिळाऊ स्वभाव आणि कार्यकर्त्यांच्या हाकेला धावनारे व्यक्तीमत्व यामूळे ना. सुधिर मुनगंटीवार यांनी घराघरात भाऊ म्हणून स्थान मिळवीले आहे. विरोधकांनाही आपलेसे वाटेल अशी छवी आज मुनगंटीवारांची आहे. त्यामुळेच आज त्यांच्या वाढदिवसा निमीत्य शुभेच्छा संदेश देणा-यांची संख्या अधिक मोठी होती. भाजपच्या पदाधिका-यांसह त्यांच्या शुभचिंतकांनी आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील जळपास सारेच होर्डीगही बुक केले होते. तसेच आज दिवसभरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ज्या साधारण कार्यकर्त्यांना हे शक्य झाले नाही. त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा संदेश देण्याकरीता सोशल नेटवर्कींग साईटचा वापर केला अश्या कार्यकर्त्यांची आणि शुभचिंतकांची संख्या हजारोच्या घरात होती. परिणामी नेहमी विविध माहीती आणि विचारांचे आधान-प्रधान करण्यासाठी वापरल्या जाणा-या सोशल साईंवर आज फक्त ना. मुनगंटीवार झडकत राहिले. यातून ईंटरनेटचा वापर करणा-या युवा वर्गात मुनगंटीवारांच्या लोकप्रियतेची प्रचिती आली.    

                                                   

Last modified on Friday, 21 September 2018 13:30
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.