हवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.

Friday, 06 July 2018 14:32 Written by  Published in चंद्रपूर

 

४८ तास पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे. या अंदाजा नुसार गुरुवारी रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार सुरु आहे. त्यामुळे ठीकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी शहरातील अणेक रस्ते सुद्धा बंद झाले आहे. त्यामूळे याचा मोठा त्रास विदयार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता उदया सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे.

हवामान खात्याने ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजा नुसार ४८ तास असाच पाऊस येत राहील्यास शहरातील  रस्ते बंद होतील त्यामूळे विदयार्थ्यांना शाळेत जातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे अँटो, स्कूल बस, शासगी बस सुद्धा शाळेत विध्यार्थ्यांना पोहोचवत असताना अडचन निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी हवामान खात्याच्या अंदाज लक्षात घेता विदयार्थ्यांच्या सोईसाठी शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी जोरगेवारांनी केली आहे. 

 

 

 

 

 

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.