20 तासांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्युत पुरवठा खंडित, अतिदक्षता विभागातिल सेवाहि ठप्प, रुग्णाच्या जीवाशी खेळ, बेजवाबदार पणाचा कळस

Thursday, 21 June 2018 14:40 Written by  Published in चंद्रपूर

रूपेश कोकावार - मागील 20 तासांपासून शासकीय वैदयकीय महाविद्यालयातील विद्युत पुरवठा खंडित असून अतिदक्षता विभागातील सेवाही ठप्प पडली आहे. त्यामुळे रुग्णाची चांगलीच ग़ैरसोय होत असून. रुग्णाच्या जीवाचा खेळ सुरु आहे.

 

दोन मोठे मंत्री असलेल्या चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्युत पुरवठा मागील 20 तासापासून खंडित असला तरी या गंभीर बाबी कड़े प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष्य दिलेल दिसत नाही. यातच अतिदक्षता विभागातील सेवा ठप्प पडल्याने रुग्णाचे जीव धोक्यात आले आहे. तसेच प्रसुती विभागतीलही विद्युत पुरवठा खंडित असल्याने नवजात बालाकांसह मातांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इतक्या मोठा रुग्णालयातील या संताप जनक प्रकारामुळे रुग्णालय - प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड़ झाला आहे. तसेच अश्या परिस्थितीला निपटन्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Last modified on Thursday, 20 September 2018 10:43
Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.